36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ९५.३९ टक्क्यांवर

लातूर जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ९५.३९ टक्क्यांवर

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या नऊ महिन्यांत लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने २२ हजारांचा आकडा ओलांडला आहे तर कोरोनातून बरे होणा-यांची संख्या २१ हजारांवर गेली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणा-याचे प्रमाण ९५.३९ टक्क्यांवर पोहोचले आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

एप्रिल २०२० पासून आजपर्यंत लातूर जिल्ह्यात ४६ हजार ५८७ आरटीपीसीआर, ९० हजार ४८४ रॅपीड अँटिजेन टेस्ट, असे एकुण १ लाख ३७ हजार ७१ टेस्ट घेण्यात आल्या. आरटीपीसीआर टेस्टमध्ये ७ हजार ६५९ तर रॅपीड अँटिजेन टेस्टमध्ये १४ हजार ३६१ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात आजघडीला एकुण २२ हजार २० रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यापैकी २१ हजार ५ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ९५ टक्क्यांवर आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ५०९ व्यक्तींचे घरात अलगीकरण करण्यात आलेले आहे. त्यापैकी १ लाख १८ हजार ७२ व्यक्तींनी घरात अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पुर्ण केलेला आहे. अद्याप ४३७ व्यक्ती घरात अलगीकरणात आहेत. २१ हजार ८ ६६ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकर करण्यात आले. त्यापैकी २१ हजार ७६३ व्यक्तींनी संस्थात्मक अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. संस्थात्मक अलगीकरणात सध्या १०३ व्यक्ती आहे.

साधारणत: फेब्रुवारी २०२० पासून संपुर्ण जगात कोरोनाचा उद्रेक सुरु झाला. मात्र प्रारंभीचे दोन महिने लातूर जिल्हा कोरोनामुक्त होता. एप्रिलमध्ये लातूर जिल्ह्यात केवळ १६ व्यक्ती कोरोनाबाधित होते. मे महिन्यात ११९, जुनमध्ये २१४, जुलैमध्ये १८५१, ऑगस्ट महिन्यात ५ हजार ९११, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ९ हजार १८८, ऑक्टोबरमध्ये ३ हजार २२, नोव्हेंबरमध्ये १ हजार ५५५ तर डिंसेेंबरमध्ये आजपर्यंत १४४ कोरोनाबाधितांची भर पडली. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत कोमोरबिडीटी असलेल्या ४७५, कोमोरबिडीटी नसलेले १७६ असे एकुण ६५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले २६७, ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले २०१, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ९८ तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ८५ जणांचा मृत्यूत समावेश आहे.

जिल्ह्यात ४ हजार ५४२ बेड शिल्लक
लातूर जिल्ह्यातील विविध ३७ संस्थांमधुन कोविड-१९ च्या उपचाराची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. या संस्थांमध्ये ४ हजार ८६१ बेडची सोय करण्यात आलेली आहे. परंतु, सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने विविध संस्थांमधून केवळ २५६ रुग्ण उपचार घेत असल्यामुळे जिल्ह्यात ४ हजार ५४२ बेड शिल्लक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख यांनी ‘एकमत’शी बोलताना दिली.

आजघडीला ३६४ व्यक्तींवर उपचार ४आजघडीला लातूर जिल्ह्यातील विविध संस्थांमधून ३६४ व्यक्ती उपचार घेत आहेत. आयसीयुमध्ये ३६ रुग्ण आहेत. गंभीर मेकॅनिकल व्हेंटीलेटरवर ३, गंभीर बीपार व्हेंटीलेटरवर १६, मध्ये ऑक्सिजनवर ५५, मध्यम परंतू ऑक्सिजनवर नसलेले ११४ तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १७६ एवढीआहे.

नवदृष्टी देणारा ग्रंथ : अण्णा भाऊ साठे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या