21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeलातूरकोरोनामुक्त नागरिकांनी साथ द्यावी

कोरोनामुक्त नागरिकांनी साथ द्यावी

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना संसर्गाबाबत सर्वांच्याच मनात एक अनामिक भिती आहे. वास्तविक ही भिती दुर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याचबरोबर संसर्गाने बाधीत झालेल्यांना कोरोनातुन मुक्त करण्यासाठी मनपा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना लातूरकरांनी वेळोळी सहकार्य केले असून आगामी काळात कोरोनामुक्त शहरासाठी लातूरकरांनी साथ द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांनी केले आहे.

कोरोनाच्या काळात वॉरियर्स म्हणून काम करणा-या डॉक्टरांसह प्रशासनातील अधिकारी व समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींचा कोरोना वॉरियर्स म्हणून रोटरी क्लब ऑफ सेंट्रल लातूर शाखेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. या अंतर्गत
रोटरी क्लब ऑफ सेंट्रल लातूर शाखेचे अध्यक्ष ऍड. नंदकिशोर लोया यांच्या पुढाकरातून मनपातील अधिकारी व कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त देविदास टेकाळे बोलत होते. या कार्यक्रमाला क्लबचे सचिव पुरुषोत्तम नोगजा, कार्यक्रम संयोजक इंजिनिअर गिरीष ब्याळे, माजी अध्यक्ष संजय बोरा, कोषाध्यक्ष बाळासाहेब खैरे, विश्वनाथ पंचाक्षरी, महेश कौळखेरे, राजु आवस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमांना प्रशासनासह लातूरकरांनी आम्हाला सातत्याने सहकार्य केले असून या सहकार्यातून आगामी काळात चांगले काम करण्याचा उत्साह मिळत असल्याचे ऍड. लोया यांनी स्पष्ट केले. यावेळी कोरोना वॉरियर्स म्हणून मनपा आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त शशीमोहन नंदा, उपायुक्त सुंदर बोंदर, शैलजा डाके, वसुधा फड, मुख्य लेखापरिक्षक प्रभाकर डाके, क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी, संजय कुलकर्णी, पांडुरंग किसवे यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका भाग्यश्री कौळखेरे, ज्योती आवसकर यांची उपस्थिती होती.

‘मेड इन पीआरसी’च्या नावाखाली चिनी उत्पादनांची भारतात विक्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या