25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरलस घेऊनही डॉक्टरला कोरोनाची लागण

लस घेऊनही डॉक्टरला कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

जळकोट : तालुक्यातील एका खाजगी डॉक्टरांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले, असे असले तरी या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली परंतु ही लस घेतल्यामुळे फुफ्फुसा पर्यंत इन्फेक्शन गेले नाही. यामुळे या डॉक्टरांची तब्येत आता ठणठणीत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच दुसरी लाट सुरु झाली आहे, लातूर जिल्ह्यातही दररोज १५०० च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. जळकोट तालुक्यातही मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे ,अशात सरकारकडून तसेच आरोग्य प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घ्यावेत असे आवाहन करण्यात येत आहे, सध्या ४५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लसीकरण करण्याचे नियोजन आहे पंरतू नागरीकांचा प्रतिसाद खुप कमी दिसून येत आहे.

सर्वात आगोदर फ्रंट लाईन वर्करना कोरोनाचे डोस देण्यात आले होते. यात डॉक्टरांचाही समावेश होता. यात जळकोट तालुक्यातील एका खाजगी प्रॅक्टिस करणा-या डॉक्टरने कोरोनाचे दोनही डोस घेतले . दुसरा डोस घेतल्या नंतर १५ दिवसांनी कोरोनाचे लक्षणे दिसू लागल्यामुळे सदरील डॉक्टरांनी तपासणी करून घेतली. त्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आला. कोरोनाची दोन्ही लस घेतल्यानंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह येणे ही जळकोट तालुक्यातील पहिलीच घटना आहे.

लस घेऊनही काळजी घ्यावी
कोरोना प्रतिबंधात्मक दोनी लसी घेतल्यानंतरही मास्क वापरणे ,सुरक्षित अंतर ठेवणे , असे जे नियम आहेत ते पाळणे गरजेचे आहे . कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात यामुळे जरी कोरोना झाला तरी कुठलाही धोका होत नाही आणि तो लवकर बरा होतो . वयोवृद्ध व्यक्तींना याचा फायदा होतो. यामुळे ४५ वर्षविरील सर्वांनी लस घ्यावी .
-डॉ. जगदीश सूर्यवंशी
(वैद्यकीय अधीक्षक जळकोट )

लस घेतल्यामुळे फायदा झाला
कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही डोस घेतल्या होत्या, यानंतर कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर लातूर येथे उपचार घेतले. लस घेतल्या मुळे शरीरात अ‍ॅन्टीबॉडीज तयार झाल्या. यामुळे विषाणू चे इन्फेक्शन फुफ्फुसा पर्यंत पोहचले नाही. यामुळे लस घेतल्याचा फायदा झाला असल्याची माहिती दोन लस घेऊनही कोरोना बाधीत झालेल्या डॉक्टरांनी एकमतशी बोलतांना दिली. प्रत्येकांनी लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

फेरनोंदणी न झालेल्या साडेचार लाख घरेलू कामगारांनाही मिळणार मदत – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या