33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home लातूर कोरोनावर महानगरपालिकेचा ‘हमला’

कोरोनावर महानगरपालिकेचा ‘हमला’

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत दि.२० जुलै रोजी शहरातील प्रमुख रस्त्यावरुन निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. एखाद्या प्रभागात संसर्गजन्य आजाराची परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या वतीने ‘हमला’ पद्धतीने सर्व यंत्रणा राबवून त्या प्रभागात स्वच्छा मोहीम घेतली जाते़ अगदी त्याच पद्धतीने कोरोना रोखण्यासाठी निर्जंतुकीकरणाचा ‘हमला’ केला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारी घेत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या लॉकडाउनला पाच दिवस झाले असून जनतेच्या सहकार्यातून ते राबवले जात आहे. लातूर शहरातील जनतेनेही या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत खबरदारीच्या उपाययोजना करुन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी निर्जंतुकीकरण फवारणीस प्रारंभ करण्यात आला. यापूर्वीही महानगरपालिकेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळपासूनच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर ही फवारणी सुरू झाली. महानगरपालिकेच्या वतीने ‘हायपोक्लोराईट’ या औषधाची फवारणी निर्जंतुकीकरणासाठी करण्यात आली़ ही फवारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागासह अग्निशमन दलाची वाहनेही वापरली जात आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख रस्त्यांवर फवारणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतर्गत रस्त्यावरही फवारणी होणार आहे. शहराच्या सर्वच भागातील प्रत्येक रस्ता फवारणी करुन निर्जंतुक केला जाणार आहे.

महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग व अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांसह इतर विभागांचे कर्मचारीही या कामात गुंतलेले आहेत.आगामी काही दिवसात संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण केले जाईल,अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घ्यावी. मंगळवारपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलती देण्यात आलेल्या असल्या तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. याकरिता स्वच्छता विभागासह अग्निशमन विभागाच्या वाहनांचा ही वापर करण्यात येत असून याद्वारे हायपोक्लोराईट औषधांची फवारणी करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यांनंतर शहरातील सर्वच भागात या पद्धतीने फवारणी करण्यात येत आहे.

Read More  लातूरातील ७ खाजगी रुग्णालयात कोवीड-१९ रुग्णावर होणार उपचार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या