22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरचाकूर पंचायत समितीत गोठा मंजुरीत भ्रष्टाचार

चाकूर पंचायत समितीत गोठा मंजुरीत भ्रष्टाचार

एकमत ऑनलाईन

चाकूर : चाकूर पंचायत समितीतील काही भ्रष्ट अधिका-याच्या आशीर्वादाने शेतक-याना गोठे मंजुरीसाठी सात हजार रुपयांची मागणी पंचायत समितीकडून होत असल्याची तक्रार शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांंनी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरस्ािंह भिकाणे यांच्याकडे केली होती. याची खातरजमा करण्यासाठी पंचायत समितीतून डॉ. भिकाणे यांनी गोठे मंजूर केलेली यादीच गटविकास अधिकारी लोखंडे यांच्याकडून घेतली व जिथे वाटपात अनियमितता दिसेल तिथे स्पॉट पंचनामा केला जावा अशी मागणी गटविकास अधिका-यांकडे केली.

काही गावात तर जुन्याच विहिरींना मुलामा देऊन नवीन विहिरींचा निधी लाटला गेला आहे व त्यासाठीही विशिष्ट रक्कम अधिकारी घेतात, अशी तक्रार डॉ.भिकाणे यांनी गटविकास अधिका-यांकडे केली आहे. काही गावांना तर अधिका-यांनी खाजगी दलाल ठेवून कुठलीही योजना त्यांच्यामार्फत आली व ठरलेला आर्थिक आकडा प्राप्त झाला तरच फाईल मंजुरीची स्वाक्षरी करायची असा भ्रष्ट उद्योग जाहीररीत्या सुरू केला आहे, अशाही तक्रारी आल्याचा पाढा त्यांनी सांगितला. हे सर्व गटविकास अधिका-याच्या आशीर्वादाने सुरू आहे का?असा प्रश्न डॉ. भिकाणे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व बाबींची सखोल तपासणी गटविकास अधिका-यांनी ग्रामपंचायतींना सतत भेटी देऊन, चौकशी समिती नेमून करावी व भ्रष्टाचार रोखावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आनंदवाडी ग्रामपंचायतमध्ये गैरमार्गाने काढलेल्या निधीचा ठपका संबंधितांवर ठेऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा. तात्काळ दोषींवर गुन्हे दाखल करावेत, असे डॉ. भिकाणे यांनी सांगीतले. गटविकास अधिका-यांंनी तात्काळ तसे आदेश विस्तार अधिका-यांना दिले. पंचायत समितीतील या गोठे, शौचालय, विहिरी या विविध बाबींमधील भष्टाचारावर प्रतिबंध नाही बसविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिका-यांची राहील तसेच मनसे भ्रष्टाचारी अधिका-यांच्या तोंडाला काळे फासो आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ.भिकाणे यांनी दिला. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष राहुल आरदवाड, तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तालुका उपाध्यक्ष संभाजी बडगिरे,तुळशीदास माने,शाखाध्यक्ष बसवराज होणराव, नरसिंग शेवाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या