23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home लातूर शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा...

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ :- नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, यासाठी महाविकास आघाडी तर्फे दि. २४ नोव्हेंंबर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयावर महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन करण्यात आले.

शिरुर अनंतपाळ शहरातील मुख्य रस्त्यावरील एलईडी लाईट,शहरातील वृक्ष लागवड,घनकचरा व्यवस्थापन व निवारण, स्वच्छतेवरील खर्च शहरात आजतागायत झालेले रस्ते व नाली कामामध्ये निकृष्ट दर्जाची चौकशी, 14 व्या वित्त आयोगा अंतर्गंत खोदलेली विहीर,विद्युतीकरणाचे साहित्य चोरीच्या मार्गाने विक्री करुन झालेला पंचनामा असताना याकामी कोणतेही कार्यवाही न करणे, शहरात शौचालय ( उडी स्पॉट ) तात्पुरत्या स्वरुपात निर्माण करुन सार्वजनिक शौचालय नसलेबाबत यांसह स्मशानभूमी स्वच्छता व सुशोभीकरण योजनेत तफावत असले बाबत उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.

यावेळी महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरजदादा चव्हाण, काँग्रेस पक्षाचे तालूकाध्यक्ष प्रभाकरराव बंडगर, शिवसेना तालुकाध्यक्ष भागवतराव वंगे, काँग्रेस मिडिया सेलचे तालुकाध्यक्ष सुधीरभाऊ लखनगावे,शहराध्यक्ष अशोक कोरे, संजय पांचाळ,जेष्ठ नेते शिवराज अण्णा धुमाळे, राजकुमार बरगे, नंदकुमार तांबोळकर,विठ्ठलराव पाटील,अनिल देवंगरे,ओम जगताप,जनार्दन पाटील, प्रमोद धुमाळे, महताब शेख,अमर आवाळे, संदिप धुमाळे,सतीश शिवणे, महादेव आवाळे, सुचित लासुणे, संभाजीराव वलांडे,सोमा तोंडारे, उदय बावगे, पांडूरंग आयतनबोने, राहुल कांबळे,विशाल गिलचे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी तहसिलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. घोषणांनी नगरपंचायत परिसर दुमदुमून गेले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या