27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home लातूर कापूस उत्पादकांचे पैसे अखेर खात्यावर

कापूस उत्पादकांचे पैसे अखेर खात्यावर

एकमत ऑनलाईन

ओमकार सोनटक्के जळकोट : जळकोट तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी पानगाव येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्री केला होता, त्यानंतर काही शेतक-यांना अवघ्या पंधरा दिवसात कापसाचे पैसे खात्यावर पडले, परंतु पाच जूनच्यानंतर ज्या शेतक-यांंनी शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विकला अशा शेतक-यांना पणन महासंघाकडून पैसे मिळाल नव्हते यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता, शेतक-यांनी ही पैसे मिळाले नसल्याची अडचण दैनिक एकमतने बातमीच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. पानगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री केलेल्या बहुतांश शेतक-यांच्या खात्यावर दि, २९ ऑगस्ट रोजी पैसे पडल्याचे मेसेज आले आहेत.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तसेच जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन केले जाते, मार्च महन्यिात कोरोना हा रोग आला यामुळे यामुळे खाजगी बाजारपेठेत कापसाचे भाव गडगडले होते, एक हजार रुपयांनी कमी भावात कापूस विकावा लागत होता, इतर शेजारी जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू झाले होते मात्र लातूरमध्ये सुरू होत नव्हते, त्यानंतर जिल्ह्यातील शेतक-यांंनी तसेच अहमदपूर व जळकोट तालुक्यातील नेत्यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे कापूस खरेदी केंद्रसाठी साकडे घातले होते.

त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी पानगाव येथे तात्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करून लातूर जिल्ह्यातील सर्व शेतक-यांचा कापूस खरेदी करावा असे आदेश दिले होते.यानंतर पणन विभागाच्या अधिका-यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतक-यांंच्या कापूस खरेदी सुरू केला, खाजगी बाजारात कापूस भाव कमी असल्यामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात पानगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विकला.

जळकोट तालुक्यातील शेतकरी अगोदरच अडचणीत होता अशात कापसाचे पैसे लवकर मिळतील, अशी अपेक्षा शेतक-यांची होती, सुरुवातीच्या टप्प्यात काही शेतक-यांंना कापसाचे पैसे पंधरा दिवसांत पडले, यानंतर मात्र ज्यांनी ८ जून त्यानंतर कापूस खरेदी केंद्रावर विकला अशा शेतक-यांना अद्यापही शासनाकडून पैसे मिळाले नव्हते , यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता याबाबत दैनिक एकमतने कापसाचे पैसे कधी मिळणार या सदराखाली वृत्त प्रकाशित केले होते, तसेच या वृताच्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचे काम केले होता. अखेर संबंधित विभागाने शेतक-यंच्या खात्यावर कापसाचे पैसे वर्ग केले आहेत. यामुळे जळकोटसह अन्य तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त केले आहे.

पाठपुराव्याबद्दल आभार
आम्ही पानगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर आमचा कापूस विक्री केला होता परंतु गत दोन महिन्यापासून आमच्या कापसाचे पैसे मिळत नव्हते, याबाबत अनेकांना विचारणा केली परंतु आम्हास कोणी सहकार्य करत नव्हते, शेवटी आम्ही दैनिक एकमत कडे आमची अडचण मांडली. एकमतनेही कापसाचे पैसे मिळत नसल्याचे वृत्त प्रकाशित केले, यामुळे आमच्या खात्यावर कापसाचे पैसे पडले आहेत, याबद्दल दैनिक एकमत चे आभार .
-बाबुराव भुरे (शेतकरी होकर्णा ता.जळकोट)

‘ड्रैगन फ्रूट’ या फळपिकातून आर्थिक उत्पन्नात वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या