26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeलातूरउदगीर येथे देशी दारु, वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त

उदगीर येथे देशी दारु, वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

उदगीर : उदगीर ग्रामीण पोलिसांनी देशी दारु व वाहनासह १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व बेकायदेशीरपणे दारू विकणा-यांवर कारवाई करण्याबाबत केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात कारवाईची मोहीम सुरु आहे.

त्या अनुषंगाने उप विभागीय स्तरावर, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शना खाली व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुक अनुषंगाने विविध पथके तयार करण्यात आले होते. पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीत विनापास परवाना देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्यासाठी दैठणा शेत शिवारात साठवणुक केली आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणच्या पथकाने दैठणा येथे पुलाचे जवळ ऊसाच्या शेतात अचानक छापा मारला असता तेथे देशी दारू टॅगो कंपनीचे २० बॉक्सकिंमती-६७२०० रूपयांची बेकायदेशर देशी दारू आणि एक स्कूटी वाहनकिं.६० हजार रूपये असा एकूण १२७२०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी बाळासाहेब मारुती बिरादार राहणार दैठणा, तालुका- शिरूर अनंतपाळ यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुरनं ५३९/२०२२ कलम ६५ (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पोह/६४ रमेश कांबळे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, पोलीस अंमलदार संतोष शिंंदे, गेडाम, नामदेव चेवले यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या