26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूर५२ शाळेत कोविड कॅप्टन

५२ शाळेत कोविड कॅप्टन

एकमत ऑनलाईन

लक्ष्मण पाटील निलंगा : कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या १९२ पैकी ५२ शाळेत कोविड कॅप्टनची नियुक्ती करण्यात आली असल्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांनी सांगितले.

लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषद शाळेत कोविड कॅप्टनची नियुक्ती करण्याचे निर्देशित दिले होते. या शैक्षणिक संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोविड कॅप्टन द्वारा नुकसान भरुन काढताना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी जोडता येते. म्हणून प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली जमदार, गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुक्यातील १९२ जिल्हा परिषदेच्या शाळे पैकी दोन दिवसात ५२ शाळेत कोविड कॅप्टनची नियुक्ती करण्यात आली आहे.

निलंगा तालुक्यातील सिंदीजवळगा, तांबाळा, हल्लाळी, नेलवाड, सांगवी, हाडगा, सेंद, जेवरी, भूतमुगळी, ंिचचोली (भंगार) गुराळ, प्रशाला निलंगा, लांबोटा आदींसह ५२ जिल्हापरिषदेच्या शाळेत कोविड कॅपटनची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड कॅप्टनची प्रत्येक शाळेतील शालेय व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष, गावचे सरपंच व गावातील शिक्षण प्रेमी यांना घेऊन नियुक्ती करण्यात येत आहे.

आज सिंदिजवळगा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिवाकर सिरसले, सरपंच रामभाऊ धुमाळ, गावातील शिक्षणप्रेमी आंगद गुरुजी, पिंटू गुरुजी, नरसिंग गुरुजी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
कोरोनामुळे शाळा बंदा आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी कोविड कॅप्टन ही संकल्पना योग्य रितीने राबविण्याचे ठरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांंचे पाच गट तयार करण्यात आले आहेत. पाच कोविड कॅप्टनची नियुक्ती करुन या गटाला विद्यार्थी जोडून दिले आहेत.

या विद्यार्थ्यांना हे कोविड कॅप्टन कोरोना विषयी जनजागृती करणार आहेत. शिवाय दररोज विद्यार्थ्यांना दोन तास मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले. याकरिता केंद्रप्रमुख तेलंग, सत्सवान शिंदे, उत्तम शेळके, बळीराम पाटील, राजेंद्र धनाजी, पंडीत पाटील यांनी परिश्रम घेतले.

उर्वरित सर्व शाळेत येत्या दोन दिवसात कोविड कॅप्टनची नियुक्ती
कोरोना माहामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी यांच्या आदेशाने तालुक्यातील १९२ पैकी ५२ जिल्हा परिषदेच्या शाळेत कोविड कॅपटनची नेमणूक करण्यात आली असून उर्वरित सर्व शाळेत येत्या दोन दिवसात कोविड कॅप्टनची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी एकमतशी बोलताना म्हणाले.

Read More  कोरोनाबाधितांची संख्या ६२५ पार; ३५ जणांचा मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या