24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरकोविड लसीकरण अनिवार्य, एैच्छिक की बक्षीसपात्र!

कोविड लसीकरण अनिवार्य, एैच्छिक की बक्षीसपात्र!

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांमध्ये जी दक्षता, गांभीर्य होते ते आज पहावयास मिळत नाही. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या डोस, दुस-या डोसला मिळालेल्या प्रतिसादाच्या तूलनेत प्रिकॉशन डोसला प्रतिसादच मिळत नाही. परिणामी प्रिकॉशन डोसचा टक्का वाढत नाही. प्रबोधन करुनही नागरिक लस घेत नसल्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेने लकी ड्रॉ काढण्याचा उपक्रम हाती घेतला. रोख बक्षीसाची योजना सुरु केली तरी नागरिकांचा त्या फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसीकरण अनिवार्य, एैच्छिक की, बक्षीसपात्र, अशी चर्चा होताना दिसुन येत आहे.

गेल्या दोन-अडीच वर्षांपुर्वी कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरु झाला. पाहता पाहता कोविडचा विषाणू सर्वत्र पसरला. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा सर्वांमध्ये भितीचे वातावरण पसरले. कोरोना आहे काय?, त्याची लक्षणे काय? त्यावर उपचार काय?, काय काळजी घ्यावी?, हे सर्व प्रश्न होते. कालांतराने या सर्व प्रश्नांची उकल झाली तोपर्यंत पहिली लाट संपली आणि दुसरी सुरु झाली. लातूर जिल्ह्याचाच विचार केला तर कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर होती. एका दिवसांत हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळून यायचे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने उभी केलेली यंत्रणा तोकडी पडायची. व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड तर सोडा साधे बेडसुद्धा त्याकाळी मिळत नव्हते.

त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसमोर अनेक अडचणी आल्या. कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील ज्या रुग्णांचा मृत्यू झाला तो कोरोनाच्या दुस-या लाटेत सर्वाधिक आहे. कोरोनाची लागण होण्याचा धुमाकुळ सुरु असताना कोरोना प्रतिबंधक लस आली. कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन लसी आल्या. त्याकाळी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर रांगा लावून लस घेतली. आज मात्र चित्र वेगळे दिसून येत आहे. आजही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनाची लक्षणे अतिसौम्य असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. २०११ च्या जनगणनेनूसार लातूर शहराची लोकसंख्या ३८२९८५ एवढी आहे.

सद्यस्थितीत अंदाजीत मध्यवर्ती लोकसंख्या ४५४५११ इतकी आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील लोकसंख्या १४३१५ एवढी आहे. १५ ते १७ वर्षे वयोगटातील लोकसंख्या २२१७५ इतकी आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकसंख्या २०५५०० इतकी आहे. ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या ७५२०० एवढी आह. ६० वर्षांच्या पुढील वय असलेली लोकसंख्या ५३१०० इतकी आहे तर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास एकुण ३७०२९० एवढी लोकसंख्या पात्र आहे. परंतू, पहिली लस ३५३३२२ जणांनी घेतली. दुसरी लस २५२५३५ जणांनी तर प्रिकॉशन डोस फक्त २३७२५ जणांनी घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या