24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरआर्ट ऑफ लिव्हिंग व ओव्हीबीआयच्या माध्यमातून फूड फॉरेस्ट निर्मिती

आर्ट ऑफ लिव्हिंग व ओव्हीबीआयच्या माध्यमातून फूड फॉरेस्ट निर्मिती

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मागील २०१३ पासून लातूरमध्ये नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. सोबतच वातावरणातील बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व नैसर्गिक शेती करण्यात येत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ३ लक्ष वृक्ष लागवड लातूर जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. यावर्षी आजादी का अमृत महोत्सव निमित्त ७५ हजार झाडांची वृक्ष लागवड आर्ट ऑफ लिव्हिंग व ओव्हरसेस व्हॅलन्ट्री फॉर बेटर इंडिया (ओव्हीबीआय) करण्यात येत आहे. या माध्यमातून फु ड फॉरेस्ट निर्माण केले जाणार आहे.

यामध्ये प्रमुख्याने सर्व पशुपक्ष्यांना व वन्यजीवांना चारा, फळे मिळतील अशा पद्धतीची व्यवस्था या जंगलामध्ये करण्यात येत आहे. या परिसरात वावरणा-या सर्व प्राण्यांना या ठिकाणी हक्काचे घर आणि अन्न पाणी मिळणार आहे. हा परिसर पूर्णपणे जैवविविधतेन असेल. दि. २१ सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातील सेलू या गावी सेलू ग्रामस्थ व गणेश विद्यालय सेलू तथा जिल्हा परिषद प्रशाला तील विद्यार्थी ५ हजार वृक्ष लागवड केली. यामध्ये १०० पेक्षा अधिक दुर्मिळ जातीची वृक्ष लागवड करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना जैवविविधता व वातावरणातील बदलाचे होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच तावरजा नदी खो-यात प्रत्येक शेतक-यांकडे २० फळांची झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी टॉवरचा खो-यातील १०० गावातील गावातील शेतक-यांची चर्चा झाली असून अनेक ठिकाणी फळबाग लागवड करण्यात आली आहे. मागील पाच वर्षात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात दोन लाख फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वातावरणातील बदलाला सुसंगत अशी फळांची वृक्ष लागवड करण्यात आलेले आहेत. अनेक ऊस उत्पादक शेतक-यांनी जिल्ह्यामध्ये सीताफळाची लागवड केलेली आहे. या नवीन जातीच्या सीताफळामुळे शेतक-यांना एक एकर शेतीतून वर्षाकाठी दीड ते दोन लाख इतके उत्पन्न मिळणार आहे, तर पेरु बागेतून आज शेतकरी एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळवत आहेत. असे याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे पर्यावरण संचालक महादेव गोमारे यांनी सांगितले.

याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार लातूरचे शिवशंकर चापुले, रोहित सरवदे, बालाजी कदम, विनायक खताळ, बालाजी पांढरे गणेश विद्यालय सेलूचे मुख्याध्यापक अनिल मंगळगिरे, सहशीक्षक कदम बाळू, नानासाहेब सेलूकर, विश्वास शिवाजीराव, शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, जिल्हा परिषद प्रशाला मादळे डी. एस., जाधव आर. डी. उपस्थित होते. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सेलू येथे मुख्याध्यापक सूर्यवंशी आर. एन., शिक्षक व विद्यार्थी गावातील ग्रामस्थ बालाजी कदम, उद्धव बंडगर, शंकर माने, भास्कर कदम, श्याम बंडगर, सुरेश कदम, संतोष बंडगर, अजित बंडगर, राजाभाऊ भुजबळ, सुखदेव भुजबळ, रोहित कदम, नितीन कुंभार, अंगद बंडगर, दयानंद पवार, राजकुमार बोकडे, तुकाराम कदम तसेच गावचे सरपंच सिदाजी कदम, उपसरपंच शिवाजी पाटील यांनी आपली उपस्थिती नोंदवून वृक्ष लागवड केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या