26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeलातूरचांगले व सुंदर शहर बनविण्यासाठी क्रेडाई प्रयत्नशील

चांगले व सुंदर शहर बनविण्यासाठी क्रेडाई प्रयत्नशील

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहराच्या प्रगतीत बिल्डर्स बांधवांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भविष्यात लातूर शहराला सुंदर बनविण्यात क्रेडाईचे सदस्य सर्वोतपरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा क्रेडाईचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर दि. ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत लातूर क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद खैरनार, सुनिल कोतवाल, आ. रमेश कराड, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, लातूरचे जिल्हाध्यक्ष सुबोध बेळंबे, एक्सपोचे चेअरमन जगदीश कुलकर्णी, सचिव महेश नावंदर, संयोजक धर्मवीर भारती, दीपक कोटलवार, जगदीश धुत, दीपक कोटलवार, महेश नावंदर, विष्णु मदने, नितीन नावंदर, उदय पाटील, किरण मंत्री, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, चंद्रकांत बिरादार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील नागरीकांची गरज ओळखून लातूर येथे क्रेडाईने जे प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन केले आहे ते कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी शांतीलाल कटारिया यांनी करुन आयोजकांचे कौतुक केले. क्रेडाईचे देशभरातील २२ हजार सदस्य प्रामाणिकपणे काम करत असुन रिअल इस्टेटच्या बाबतीत लातूरही अल्पावधीत प्रगतीपथावर दिसेल. सध्या लातूरकडे एज्युकेशनल हब म्हणून पाहिले जात असून भविष्यात ते बिल्डींगच्या व्यवसायातही अग्रेसर असेल.

प्रास्ताविक सुबोध बेळंबे यांनी केले. प्रारंभीच्या काळात के्रडाईच्या सदस्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आता अनेकांच्या सहकार्याने क्रेडाईची सुसाटपणे वाटचाल सुरु असून बांधकाम क्षेत्रात नवीन लातूर पॅटर्न निर्माण करण्यासाठी आम्ही काम करीत असल्याचेही यावेळी सुबोध बेळंबे म्हणाले. यावेळी आ. रमेश कराड, विक्रांत गोजमगुंडे, पृथ्वीराज बी. पी., धर्मवीर भारती, जगदीश कुलकर्णी, प्रमोद खैरनार यांनीही मार्गदर्शन केले. मध्यंतरीच्या काळात बिल्डर्स बंधूना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले तरीही न डगमगता त्यातून मार्ग काढत आम्हा सर्वांची वाटचाल सुरू असल्याचे यावेळी जगदीश कुलकर्णी म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून तसेच दीपप्रज्वलन करुन क्रेडाई एक्सपोचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर शांतीलाल कटारिया व अन्य मान्यवरांचा क्रेडाईच्या वतीने तर त्यांच्या पत्नी उषा कटारिया यांचा रशमी बेळंबे वुमन्स विंगच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी रवी कडगे, नारायण गिते, जयकांत गिते, अनुराग जैन, किरण मंत्री, आशिष कामदार, सुनिल कोतवाड यांच्यासह क्रेडाईचे अन्य सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय जेवरीकर यांनी केले तर उदय पाटील यांनी आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या