22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरचार दिवसांत १२७ मद्यपींवर गुन्हे

चार दिवसांत १२७ मद्यपींवर गुन्हे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणार-यांच्या विरोधात विशेष ड्रंक अँड ड्राइव्हची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या १२७ मद्यपींच्या विरोधात गेल्या चार दिवसात पोलिसांनी कोर्टात गुन्हे दाखल केले आहेत. मद्यप्राशानानंतर वाहने चालवणा-या चालकांमुळे अनेक गंभीर अपघात होतात. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या वाढत्या प्रकारामुळे गेल्या काही दिवसात पोलिसांनी मद्यपींना धडा शिकवण्यासाठी दंडात्मक कारवाईसोबत थेट कोर्टात पाठविण्याची मोहीम पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेश व निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात राबविण्यात आली असून दिनांक २४ ते २७ या ४ दिवसाच्या कालावधीत १२७ मद्यपी वाहनचालकांना कोर्टात पाठवण्यात आले असून जवळपास १२७ इतक्या वाहनचालकांवर कारवाई करीत ३८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हबाबत वाहतूक पोलिस सातत्याने कारवाई करीत आहेत.

मद्यप्राशन करून वाहन चालवणे गुन्हा असून मद्यप्राशन करून वाहन चालविण्यामुळे चालकाचा तसेच इतरांचा जीव धोक्यात सापडतो. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करताना ब्रेथ अनालायझर वापरले जात आहे. रक्तातील अल्कोहलचे प्रमाण जास्त आढळून आल्यास संबंधित वाहनचालकाचे वाहन लागलीच जमा करण्यात येते. तसेच, त्याच्यावर गुन्हा दाखल करून ते प्रकरण कोर्टात सादर करण्यात येत आहे. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या गुन्ह्यात संशयित दोषी आढळून आला तर त्यास मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८५ नुसार सहा महिने शिक्षा किंवा दहा हजार रुपयांचा दंड किंवा हे दोन्ही होऊ शकतात. याबरोबर त्याने दुस-या वेळी अशाच प्रकारे कायद्याचे भंग केल्याचे सिध्द झाल्यास दोन वर्षापर्यंत ​शिक्षा होऊ शकते.

मद्यपान करून वाहन चालवू नये
वाहतूक नियमांचे वाहन चालकांनी काटेकोरपणे पालन करून मद्यपान करून वाहन चालवू नये. सदरची मोहीम यापुढे अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन लातूर पोलिसाकडून नागरिकांना करण्यात येते आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या