24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरबांधकाम साहित्यांनी रस्ते बंद करणा-यांवर गुन्हे दाखल होणार

बांधकाम साहित्यांनी रस्ते बंद करणा-यांवर गुन्हे दाखल होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अतिश्य झपाट्याने विकसीत होत असलेल्या शहरांपैकी एक शहर म्हणजे लातूर शहर होय. उन्हाळयाच्या चार महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. काही बांधकामे अद्यापही सुरु आहेत. परंतू, यातील अनेकांनी स्वत:चे बांधकाम साहित्य रस्त्यावरच ठेवून रस्ते अडविलेले आहेत. त्यामुळे वाहुकीस अडथळा होऊन नागरीकांची गैरसोय होत आहे. रस्ते अडविलेले बांधकाम साहित्य लातूर शहर महानगरपालिका प्रशासनच्या वतीने जप्त करण्यात येणार असून रस्ते पुर्णपणे बंद करणा-यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक अमन मित्तल यांनी दिली.

शहरातील जवळपास सर्वच प्रभागांत खाजगी बांधकामे सुरु आहेत. अंतर्गत रस्ते अधीच लहान आहेत. लहान-मोठ्या नगरांना जोडणा-या रस्त्यांवर वाळू, दगडी कच, दगडाची खडी, विटा, सळ्या, परंचा बाधण्याची लाकडे, सेंट्रींग प्लेटा, पाण्याचे मोठंमोठे बॅरल आदी साहित्य रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने जोड रस्ते वाहतुकीस बंद झाले आहेत. रस्ता बंद करणे कायद्याने गुन्हा आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकुन लहान-मोठे रस्ते पुर्णत: बंद करणा-यांवर महानगरपालिका, पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तात्पुरत्या स्वरुपात रस्त्यावर बांधकाम साहित्य पडले असे तर ते तातडीने काढून घेऊन रहदारीला रस्ता मोकळा करुन द्यावा. रहदारीस अडथळा होईल, अशी एकही कृती गुन्हा ठरते. त्यामुळे बांधकाम साहित्य रहदारीला अडथळा होईल, अशा पद्धतीने न ठेवणे ही संबंधीतांची जबाबदारी आहे.

शहरातील लहान-लहान रस्त्यांवरील परिसरात बांधकाम सुरु असल्यास अनेकवेळा नाईलाजाने रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवावे लागते. बांधकामासाठी हे साहित्य वापरल्यानंतर बांधकामाचा जो खरडा निघतो तोही रस्त्यावरच टाकला जातो. पार्किगला जागा नसल्याने वाहनेही रस्त्यावरच उभी केली जातात. परंतू, बांधकाम साहित्य टाकताना आणि वाहने उभी करताना किमान दुसरे एक वाहन रस्त्याने सुलभरित्या गेले पािहजे. याचा साधा विचारही कोणी करताना दिसत नाही. सार्वजनिक रस्त्याच्या वापर खाजगी मालमत्ते सारखा करणे चुकीचे आहे. मात्र बहुतांश जणांकडून तसा वापर केला जात असल्यामुळे अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा ईशारा महानरगपालिका प्रशासनाने दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या