22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यातील पिके करपली

जळकोट तालुक्यातील पिके करपली

एकमत ऑनलाईन

जळकोट : तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यात आजपर्यंतच्या पावसाची सर्वात कमी नोंद झाली आहे . जळकोट मंडळात केवळ ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात उघडीप दिल्याने शेतक-यांची पिके करपून गेली होती. असे असले तरी शासनाकडून जळकोट तालुक्याला काही मदत मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

गत दहा वर्षापर्यंत अगस्ट महिन्यात जळकोट तालुक्यात ऑगस्ट २०२२ मध्ये सर्वात कमी म्हणजे. सरासरी केवळ ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यामध्ये जे तापमान नोंदवले गेले ते देखील ४० अंशसेल्सीअसवर होते. त्यामुळे उन्हाळ्याची प्रचिती अगस्ट महिन्यात येत होती . जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे अति पावसाने पिके वाया गेली आणि आता उरले सुरलीची पिकेही ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे वाया गेली. जळकोट तालुक्याचा गत सहा वर्षाचा ऑगस्ट महिन्याचा पावसाचा आलेख पाहिला तर ऑगस्ट २०१७ मध्ये २२२ मिमी ,ऑगस्ट २०१८ मध्ये २४६ मीमी, ऑगस्ट २०१९ मध्ये २४८ मिमी, ऑगस्ट २०२० मध्ये १४५ मीमी, ऑगस्ट २०२१ मध्ये २१२ मीमी आणि आता ऑगस्ट २०२२ मध्ये फक्त ६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

कमी पावसावर पिके कसे येतील असा प्रश्नही शेतकरी आता उपस्थित करीत आहेत. शेतक-यांच्या डोळ्यात पिके वाळून गेली. आता दोन दिवसापासून जळकोट तालुक्यात पाऊस पडत आहे परंतु या पावसाचा काही उपयोग होताना दिसून येत नाही . ज्या शेतक-यांचे सोयाबीन हिरवे आहे त्यांना शेंगाच लागल्या नाहीत. ज्या शेतक-यांच्या शेंगा सोयाबीनला लागल्या होत्या त्या शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. तेव्हा शेतक-यांंना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जळकोट तालुक्यातील शेतक-यांनी केली आहे.

अतिवृष्टीची मदत जळकोट तालुक्याला नाही
जळकोट तालुक्यामध्ये जून तसे जुलै महिन्यात सलग पाऊस झाला होता या पावसामुळे शेतक-यांचे अति पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. जळकोट मंडळात तर अतिवृष्टीची नोंद झाली होती. पिके पाण्याखाली गेली होती अशा स्थितीत शासनाने शेतक-यांंना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. हेक्टरी तेरा हजार रुपयांच्या वर तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यांत आनंदाचे वातावरण होते परंतु शेतक-याच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात जी मदत जाहीर झाली आहे त्यात जळकोट तालुक्याचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या