22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरजळकोटमध्ये लस घेण्यासाठी गर्दी

जळकोटमध्ये लस घेण्यासाठी गर्दी

एकमत ऑनलाईन

जळकोट : तालुक्यामध्ये दि. १२ मेपासून ४५ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरणास सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या दिवशी जळकोट ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर लस घेण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती . सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. जळकोटमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसींचा तुटवडा होता, विशेष म्हणजे ब-याच दिवसा पासून कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध नव्हती त्यामुळे अनेक नागरिकांचे पहिली लस घेऊन पंचेचाळीस दिवस उलटले होते.

त्यामुळे अशा नागरिकांमध्येचिंतेचे वातावरण पसरले होते यातच महाराष्ट्र सरकारने भारत बायोटिक कंपनीच्या लसीचा जो साठा होता तो १८ ते ४४ वर्षापर्यंतच्या नागरिकांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवस या वयोगटातील व्यक्तींना ही लस टोचण्यात आली परंतु महाराष्ट्र सरकारने दि ११ मे पासून या वयोगटाचे लसीकरणाचे रजिस्ट्रेशन बंद केले आणि भारत बायोटेक कंपनीची जी कोव्हॅक्सिन ही लस आहे ती लस ४५ वयोगटातील वरील नागरिकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विशेष म्हणजे ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच कोव्हिशील्ड लस देखील संपलेली होती यामुळे जवळपास तालुक्यात लसीकरण खोळंबले होते परंतु दि १२ मेपासून दोन्ही कंपनीच्या लशी उपलब्ध झाल्यामुळे जळकोट तालुक्यातील नागरिकांनी तसेच शहरातील नागरिकांनी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयांत तसेच वांजरवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गर्दी केली होती.

सुरुवातीला ग्रामीण भागातील जनतेचा लस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद होता परंतु दुसरी लाट अतिशय घातक ठरत असल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा लसीकरण केंद्राकडे वळलेला आहे. ग्रामीण भागातीलजनतेला लसीकरणाचे महत्त्व समजल्याने कोरोनामुक्तभारत मोहिमेसाठी दिलासादायक ही बाब आहे.नागरिकांना लसीकरणा दरम्यान कोणतीहीअडचण येऊनये म्हणून जळकोट ग्रामीण रुग्णालयात येथील वैद्यकीय अधिकारी, तसेच परिचारिका व आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत

सास-यांचे निधन होऊनही लसीकरण सेवा ठेवली सुरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या