27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरपर्यावरण संवर्धनासाठी पंढरपूरपर्यंत सायकलवारी

पर्यावरण संवर्धनासाठी पंढरपूरपर्यंत सायकलवारी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पर्यावरण संगोपन, संवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी लातूर सायकलिस्ट क्लब लातूर नेहमी विविध उपक्रम राबवित असते त्याचाच एक भाग म्हणुन लातूर -पंढरपूर -लातूर जाणे-येणे हे अंदाजे ४०० किमीचे अंतर सायकल वारी करुन पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. या सायकल वारीमध्ये ७६ जणांनी सहभाग घेतला असुन त्यात काही महिला सदस्यदेखील सायकलवारी करण्यासाठी सहभागी झाले आहेत. सर्व सायकलिस्ट हे दि. २ जुलै रोजी पहाटे ४ वाजता क्रीडा संकुल येथुन पंढरपूरला सायकलवर रवाना होणार असुन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पोहंचणार आहेत.

दि. ३ जुलै रोजी पंढरपूर नगरीला प्रदक्षिणा, सायकलरिंगण सोहळ्यात सहभाग, तनपूरे महाराज यांच्या मठात प्रवचन, महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम नियोजित आहे. विशेष म्हणजे नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, धुळे, कोल्हापूर, सिन्नर, कोपरगाव, बारामती, गंगाखेड, कराड, इचलकरंजी, इंदापूर, मुंबई, नातेपुते, कोरेगाव, माढा, माळशिरस, राहुरी, इत्यादी ठिकाणाहुन जवळपास चारहजार सायकलिस्ट येणार आहेत.

या सायकल वारीचे अजुन एक वैशिष्ट म्हणजे पायी वारी करणा-या वारक-यांप्रमाणेच सायकलवारीची नविन परंपरा सुरु होत आहे. या वारीसाठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिलिंद गुणाजी हजर राहणार आहेत, अशी माहिती लातूर सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष श्रीरंग मद्रेवार, उपाध्यक्ष श्रावण उगले, सचिव अमृत मेळकुंदे यांनी दिली आहे. या सायकलवारीचे नियोजन हे क्लबचे समिती सदस्य प्रफुल्लचंद्र कुलकर्णी, संदेश महिंद्रकर, विष्णु मदने, प्रतापसिंह बिसेन, प्रविण खरवळे, सतिष खोबरे, योगेश कर्वा आदी करत असुन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संतोष बादाडे आणि बाईक स्टुडिओचे योगेश काळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या