निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसराला दि १७ मे रोजी पडलेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार दि 18 मे रोजी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्यासह उपविभागीय अधिकारी शोभा जाधव व तहसिलदार गणेश जाधव यांनी शेतक-याच्या बांधावरून भेटी देऊन औराद शहाजानी व तगरखेडा येथील नुकसानीची पाहणी केली.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी सह परिसरात दि १७ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे औराद शहाजानी, तगरखेडा, हलसी(तु), हलगरा, शेळगी सावरी गाव शिवारामध्ये वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने मो्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून शासनाच्याकडे दाखल करण्याचे आदेश पारित केले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्यासह उपविभागीय अधिकारी शोभा जाधव व तहसीलदार गणेश जाधव यांनी तगरखेडा येथील विजयकुमार शिवाजी पाटील, अरुण पाटील, त्यांच्या शेतीस भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. औराद येथील सतीश मरगणे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाचे नुकसानीची पाहणी केली,
यादरम्यान धावत्या परस्थितिी मध्ये देखील कर्तव्यदक्ष तहसीलदार गणेश जाधव यांनी औराद शहाजानी येथील तलाठी बालाजी भोसले यांना वाळूच्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यास भाग पाडले, सदर जप्त केलेले वाळूचा ट्रॅक्टर तलाठी भोसले यांनी पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.यावेळी माजी सरपंच वैजनाथ वलांडे, उपसरपंच मदन बिरादार तंटामुक्ती अध्यक्ष अंगद मूळजे, चेअरमन रमेश राघो, सुभाष डावरगावे, ंिलबराज थेटे, रंजीत सूर्यवंशी, औराद बाजार समितीचे संचालक हाजी सराफ ,गोरख नवाडे, अंगद मूळजे, विजय कलगाणे आदींसह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.