21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरसांळुके, निलंगेकर, डॉ.भिकानेंकडून नुकसानीची पाहणी

सांळुके, निलंगेकर, डॉ.भिकानेंकडून नुकसानीची पाहणी

एकमत ऑनलाईन

निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यातील शेडोळ व कोतल शिवणीसह परिसरात सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेतीसह घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरात शिरून नुकसान झाले आहे. शिवाय खरिपाची पिके पूर्णपणे पाण्यात असल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.जमीन खरडून शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची बांधावर जाऊन काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, भाजपाचे प्रदेश सचिव अरंिवंद पाटील निलंगेकर व मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरंिसंह भिकाने यांनी पाहणी करून शेतक-यांंच्या व्यथा जाणून घेत दिलासा दिला आहे.

शेडोळ व कोतल शिवणी परिसरात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेल्याने शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोतल शिवणी, शेडोळ, वडगाव, तुपडी,अंबेगाव, मसलगा, हाडगा, वाडीशेडोळ, आनंदवाडी आदीसह परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शेतीमधील माती खरडून गेली आहे. शिवणी कोतल येथील शेतातील पाणी गावामध्ये घुसल्याने कमलाबाई वाघमारे, विठ्ठल गुरणे, सुभाष रासे,जोगदंड माधव, व्यंकट औरादे यांच्या घरासह अन्नधान्याचेही भिजून नुकसान झाले आहे.

तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलन: साळुंके
या नुकसानीची काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी पाहणी करून शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतक-यांना लवकरात लवकर मदत भेटली नाही तर त्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.शिवाय पंचनामे न करता शेतक-यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी अभय साळुंके यांनी केली. यावेळी उपसरपंच विकास पाटील, किशोर धुमाळ, शरद धुमाळ, चंद्रप्रकाश धुमाळ, शुभम पाटील, व्यंकट शेळके, महेश शेळके, प्रल्हाद शेळके, प्रमोद पाटील, किरण शेळके, व्यंकट रजपूत आदीसह शेतकरी उपस्थित होते.

नुकसानीची मदत तातडीने देऊ : निलंगेकर
भाजपचे प्रदेश सचिव अरंिवद पाटील निलंगेकर यांनी शेडोळ,आनंदवाडी, शिवणी कोतल या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच शेतीसह पिकांचे, घराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून लागेल ती मदत लवकर देऊ,असे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासकीय अधिका-यांना गावातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे होईपर्यंत गाव सोडू नये अशा सूचना केल्या. यावेळी नायब तहसीलदार घनशाम अडसुळ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, जलसंधारण उपविभागीय अधिकारी प्रदीप काळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, चेअरमन दगडू सोळुंके, व्यकंटराव धुमाळ, शहराध्यक्ष अ‍ॅड. विरभद्र स्वामी, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, किशोर लंगोटे, संजय दोरवे, संतोष वाघमारे, तानाजी बिरादार, तम्मा माडिबोने, सुमित इनानी, अर्जुन पौळ, अशीष पाटील, नागेश पाटील, प्रशांत पाटील, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

तातडीने मदत न मिळाल्यास खळ्ळखट्याक: डॉ.भिकाने
मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरंिसंह भिकाणे यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन विदारक परिस्थितीची पाहणी केली. शासन व प्रशासनाने फक्त पंचनामे, पाहणी नाहीतर शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी व बळीराजाला न्याय द्यावा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या विरोधात खळखट्याक करण्याचा इशारा दिला. यावेळी तालुकाध्यक्ष सुरज पटेल, जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप शेळके, तालुकाउपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, तालुकाउपाध्यक्ष कृष्णा सुरवसे, तालुकाउपाध्यक्ष प्रदीप माने, विभागाध्यक्ष नवाज पठाण, प्रसिद्धी प्रमुख माणिक धुमाळ, राजेंद्र लोंढे, दत्तू धुमाळ, शेळके, शाखाध्यक्ष माणिक धुमाळ, प्रितम धुमाळ, भरत कलमले, रंजीत धुमाळ आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या