31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरपोहरेगाव परिसरातील सोयाबीन, उसाचे नुकसान

पोहरेगाव परिसरातील सोयाबीन, उसाचे नुकसान

एकमत ऑनलाईन

पोहरेगाव (शरद राठोड) : पोहरेगाव परिसरात मागील काही दिवसापासून अधून मधून विजेच्या कडकटासह पडलेल्या पाऊस व वादळी वा्न-यामुळे ऊस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ऐन सोयाबीन काढणीच्या वेळीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. शेतातील सोयाबीनच्या गंजी पाण्याखाली गेल्याने पिके मातीमोल झाली आहेत शिवाय मांजरा नदीकडे असलेल्या ऊस पिके वादळी वा-यामुळे भुईसपाट झालेली आहेत.

पोहरेगाव परिसरातील बहुतांश भागात प्रामुख्याने मोठेगाव,चाडगाव,भोकरंबा,शेरा, ईट्टी,आंदलगाव डिगोल या भागात पडलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत.शिवाय काढण्यात आलेल्या सोयाबीनच्या गंजीमधील घुग-या झाल्या आहेत.त्यामुळे या हंगामामध्ये कष्ट करून ऐनवेळी हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गाच्या प्रकोपने धुळीस जात असल्याने शेतक-यांवर उस्मानी संकट कोसळले आहे. परतीच्या पाऊस हा शेतक-याच्या जीवावर उठला असून प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-याला काहीतरी मदत करण्याची मागणी सर्व परिसरातील शेतक-यांमधून होत आहे.या परतीच्या पाऊसामुळे ढगफुटी होऊन परिसरातील शेतक-यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना ग्रामीण मतदारसंघाच्या आमदारांनी दिले आहेत.

या सूचनेप्रमाणे प्रशासनाडून महसूल, कृषि,पंचायत समिती व विमा कंपनी यांनी वेळीच पंचनामे करून शासन स्तरावर शेतक-याला मदत मिळावी म्हणून अहवाल सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतक-याच्या हंगामातील पिकांचे नुकसान मिळाल्याने त्यांना बसलेल्या आर्थिक फटक्याला शासनाने मदत करावी जेणेकरून उभारी येईल, अशी जोर धरु लागली आहे.

अँटिव्हायरसच्या नावाखाली चिनी हॅकर्स इन्स्टॉल करतायेत मालवेअर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या