21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरनेकनाळ गोगलगायींमुळे सोयाबीन पिकांचे नुकसान

नेकनाळ गोगलगायींमुळे सोयाबीन पिकांचे नुकसान

एकमत ऑनलाईन

देवणी : तालुक्यातील नेकनाळ शेत शिवारात सोयाबीनच्या कोवळ्या पिकांवर गोगलगायींनी हल्ला चढवून पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. चक्क सोयाबीन पिकाचा सुपडासाफ केल्याची तक्रार सोमवारी दि.२५ जुलै रोजी नेकनाळ येथील शेतकरी निरंजन स्वामी यांनी तालुका कृषि विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नेकनाळ शेतशिवारातील सर्वे नंबर ६७/१, ६७/२ व ६६/१ मध्ये शेतकरी निरंजन बस्वराज स्वामी, शिवप्रसाद बस्वराज स्वामी आणि शिवाजी रासुरे यांच्या शेतीतील सोयाबीन गोगलगायीने होत्याचे नव्हते केले. परिणामी हिरवीगार दिसणारे शेत शिवार उन्हाळ्याप्रमाणे सर्वत्र काळेभोर दिसत आहे. सदरील शेतीत भेट देऊन पाहणी केली असता सोयाबीन पिकांचे कोवळी पिके मोठ्या प्रमाणावर उगवल्याचे दिसून आले उगवलेल्या प्रत्येक पिकावर गोगलगाय हल्ला चढविल्याने सोयाबीन पीक होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या