24.4 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूरपावसामुळे ऊस, सोयाबीनचे नुकसान

पावसामुळे ऊस, सोयाबीनचे नुकसान

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळामध्ये दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. घोणसी परिसरामध्ये दोन तासांत तब्बल १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे घोनसी परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील ऊस आडवे पडले आहेत तर सोयाबीन व ज्वारीचे नुकसान झाले आहे. उदगीर-जळकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

जळकोट तालुक्यामध्ये फक्त घोणशी मंडळात मोठा पाऊस झाला जळकोट मंडळांमध्ये २१ सप्टेंबर च्या रात्री पाऊस पडल्याची नोंद नाही, घोणसी परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला, पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस होता, कमी वेळात अधिक पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाणी झाले होते, अनेक शेतजमिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले , शेतातील कालवे भरून गेले. काही ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या, जळकोट तालुक्यातील शेतक-यांचे सोयाबीन काढणीस आले होते परंतु या पावसामुळे तसेच यापूर्वी पडलेल्या पावसामुळे सोयाबीनचे ही नुकसान झाले आहे. तिरुका, घोनसी, धोंडवाडी, खांबळवाडी ,सुलाळी ,गुती, अतनुर , मेवापूर, परिसरात जोरदार पाऊस झाला. आजपर्यंत घोणसी मंडळात रेकॉर्ड ब्रेक १००० मिलिमीटर च्या वर पाऊस झाला आहे.

तहसीलदारांकडून नुकसानीची पाहणी
घोणशी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला होता यामुळे शेतक-यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन तर पूर्ण हातचे गेले आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी घोनसी परिसरात जाऊन पाहणी केली, प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ पंचनामे सुरुवात करू, अशी माहिती तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली.

शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी
या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनची प्रचंड हानी झाली आहे, परिसरातील उसाचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तात्काळ घोणसी परिसरातील शेतक-यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीच्या पिकाचे पंचनामे करून, तात्काळ नुकसान भरपाई द्यावी तसेच पिक विमा मंजूर करावा अशी मागणी विलासराव देशमुख युवा मंचचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती पांडे यांनी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कच्चा पूल गेला वाहून
या झालेल्या मुसळधार पावसामुळे मेवापूर ते अतनूर या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद विभाग अंतर्गत येणारा कच्चा पूलही वाहून गेला आहे त्यामुळे परत एकदा या गावाचा संपर्क अन्य गावांशी तुटलेला आहे, गत महिन्यांमध्ये मेवा पूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे हा पूल वाहून गेला होता यानंतर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने तात्पुरता कच्चा पूल उभारण्यात आला होता परंतु आता तोही २१ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या पावसामध्ये वाहून गेला आहे. यामुळे मेवापूर येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी पूल मंजूर करून पक्या पुलाची उभारणी करावी, अशी मागणी सरपंच कल्याण पाटील यांनी केली आहे.

ऑक्सिजनचं प्रमाण तपासणारी कोणतीही अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका : केंद्र सरकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या