27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरतळेगाव रस्त्याचे काम रखडल्याने रहदारीस धोका

तळेगाव रस्त्याचे काम रखडल्याने रहदारीस धोका

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : प्रतिनिधी
या शहरातून तळेगावकडे जाणारा रस्ता मौत का कुआ बनला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे
पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन महिन्यापासून अहमदपूर ते तळेगाव लगत पुढे बांधकाम विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून ते सध्याच्या स्थितीमध्ये खोदकाम करून अर्धवट ठेवले आहे. यामुळे वाहन चालकांना व वाटसरूंना याचा नाहक त्रास होत असून लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

तळेगाव रोडवरील दूरसंचार कार्यालयापासून ते जय ंिहंद प्रयाग विद्यालयापर्यंत एका बाजूने सलग चार फूट खोल व दहा फूट रुंद खोदकाम करण्यात आले असून एका बाजूने मोठा नाला आहे तर डांबरीकरणाचा मुख्य रस्ता दहा फुटाचा असून तो अरुंद आहे. तळेगाव रोड वरून तेलगाव पाटी ची वाढती रहदारी आणि जुन्या अहमदपूर गावामध्ये जाणारा रस्ता याच रोडवरून जात असल्याने दुचाकी, चार चाकी, स्कूल बस, व अवजड वाहने सतत जात असल्याने या ठिकाणी रहदारीचा सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.शाळा, कॉलेज , क्लासेस या भागात असून बरेच पालक आपल्या पाल्यांना घेऊन वास्तव्यास आहेत त्यामुळे विद्यार्थी संख्याही भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहे. खोदकाम करून ठेवल्याने लहान मुले नेहमी या खड्ड्यात पडत आहेत त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

आतापर्यंत वाहनधारक समोरासमोर बाजू देताना अनेक वाहने खड्ड्यात पडली असून वाहनधारकांचे नुकसान होत आहे त्यांना बाजू देण्यास समस्या निर्माण होत असून आपापसात वाद निर्माण होत आहेत. एका बाजूस मोठा नाला तर दुस-या बाजूस खोदकाम त्यामुळे मोठ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता अरुंद असल्याने वाहने जागेवर तासंतास थांबून राहतात. याबाबत उपविभागीय अभियंता आणि मुकदम यांना सूचना देऊन तात्काळ हे काम मार्गी लावून नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे महेश देवणे यांनी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी अरुण फुलारी यांना दिले आहे. याची माहितीस्तव एक प्रत तहसीलदार अहमदपूर व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदपूर यांना देण्यात आली आहे.

या निवेदनावर भागवत गवळी, तिरुपती गुट्टे, मनोज पंचारे, हमीद मोमीन, बालाजी गलाले, विलास जाधव, पुरूषोत्तम कुलक र्णी, हणमंत पाटेवाड, केशव मुसळे, मल्लिकार्जुन स्वामी, सचिन गिरी, बब्रुवान पवार, रवी रोडे, निवृत्ती मधेवाड यांच्यासह शिवाजीनगर ,त्रिवेणी नगर, भगवान नगर, बँक कॉलनी, येथील रहिवासांच्या स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या