22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरदयानंद कला महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभागाच्या स्वयंसेवकांचे घवघवीत यश

दयानंद कला महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभागाच्या स्वयंसेवकांचे घवघवीत यश

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा कार्यालय लातूर अंतर्गत एचआयव्ही एड्स जनजागृती करिता पोस्टर डिझाईन व रक्तदान जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये दयानंद कला महाविद्यालय,लातूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून जनजागृतीपर विविध पोस्टर तयार केले. तसेच रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदानाचे महत्त्व सर्वांना कळावे याकरिता रक्तदान पर जनजागृती शॉट व्हिडीओ स्पर्धा संपन्न झाल्या.

एच.आय.व्ही एड्स जनजागृतीपर पोस्टर डिझाईन स्पर्धेमध्ये भरत महादेव पवार या स्वयंसेवकाने लातूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यास रुपये रोख ५ हजार रूपये, महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या बालाजी पाटील हिने पटकावला रोख रक्कम ३ हजार रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह व तिसरा क्रमांक प्रत्यक्ष नाईक यांनी पटकावला २ हजार रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

रक्तदान पर जनजागृती शॉट व्हीडीओ स्पर्धा यात कुमारी रजनी ठाकरे हीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला तीला ५ हजार रुपये रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, राधा लोंढे ३ हजार रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह व तय्यब मन्सूर सय्यद याने तिसरा क्रमांक पटकावला २ हजार रुपये रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

या स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्यातील रेड रिबीनक्लब असलेले १६ महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होते. या सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे परिश्रम आणि घवघवीत यश पाहून संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, उपाध्यक्ष ललितकुमार शहा, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांनी कौतुक व अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, प्रा. डॉ. सुभाष कदम, प्रा.डॉ. सुनिता सांगोले, प्रा. डॉ. मच्छिंद्र खंडागळे, प्रा. डॉ. संतोष पाटील, प्रा. विवेक झंपले, प्रा. महेश जंगापल्ले आदींनी कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या