26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरदयानंद कला महाविद्यालयात 'राष्ट्रभक्ती ले हृदय में'

दयानंद कला महाविद्यालयात ‘राष्ट्रभक्ती ले हृदय में’

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आजादी का अमृत महोत्सव व स्वराज्य सप्ताह निमित्त दयानंद कला महाविद्यालयात ‘राष्ट्रभक्ती ले हृदय मे’ या राष्ट्रभक्तीपर गीताचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते थोर क्रांतीकरक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ.संतोष पाटील, डॉ. अंजली जोशी, डॉ. संदीपान जगदाळे, डॉ. आर. एस. पारवे, डॉ. पी. एस. सूर्यवंशी, डॉ. देवेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रारंभी ‘राष्ट्र की जय चेतना का गाण वंदे मातरम’ हे गीत दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर ‘तेरे मिट्टी में मर जावाँ’ हे गीत चिरंजीव अधिराज जगदाळे याने सादर करुन विद्यार्थ्यांना रोमांचित केले. अनमोल कांबळे यांनी ‘संदेसे आते है’ हे गीत सादर करून सैनिकांची मनोभावना व्यक्त केली. त्यानंतर समूहाने ‘दिल दिया है, जान भी देंगे ए वतन तेरे लिए’ हे गीत सादर करून राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले. ‘माँ तुझे सलाम’ हे गीत ऋषी कांबळे यांने सादर केले. तर प्रियंका बनसोडे हिने ‘ये मेरे वतन के लोगो’ गीत सादर कंरून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ‘भारत वंदे मातरम’ या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. शरद पाडे, प्रा. सोमनाथ पवार, सुरज साबळे, पूजा माळी, आनंत खलुले यांनी मोलाचे योगदान दिले. राष्ट्रभक्ती ले हृदय में या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या