लातूर : दयानंद कला महाविद्यालयात वार्षिक स्रेह संमेलन ‘अमृत २०२२’ चे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी स्नेह संमेलनाच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे होते. दयानंद कला हे कलावंत घडवणारे विद्यापीठ असून येथून अनेक कलावंत घडत आहेत, असे युवराज पाटील यांनी सांगीतले.
युवराज पाटील पुढ म्हणाले की, कलावंत कलेचा उपासक असतो.तो आपली कला सादर करण्यासाठी सदैव तत्पर असतो.त्याला फक्त उत्तम व्यासपीठची गरज असते.ते व्यासपीठ महाविद्यालय उत्तम रीतीने उपलब्ध करून देते.यामुळेच आपल्या महाविद्यालयातील कलावंत जगभरात नावलौकिक प्राप्त करत आहेत. स्नेह संमेलन निमित्याने देण्यात येणार सर्वोच्च सन्मान ‘दयानंद श्री’ व दयानंद श्रीमती पुरस्कार जाहीर करण्यात आले.यात ‘दयानंद श्री’ हा पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजना विभागातील भरत महादेव पवार, तर ‘दयानंद श्रीमती’ हा पुरस्कार प्रतिनिधी पूजा माळी यांना देण्यात आला. स्नेह संमेलना निमित्ताने महाविद्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच सुरुची भोजनाचे आयोजन भारतीय बैठक व्यवस्थेत करण्यात आले होते.यात स्त्री शक्तीचा जागर करत महिलांना प्रथम पंगतीचा मान देण्यात आला.
वार्षिक स्रेहसंमेलनात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभाग, क्रिडा विभाग आदी क्षेत्रांतील यशाबद्दल पारितोषिके देण्यात आली. वार्षिक स्नेह संमेलनात विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, वाद्यांचा ताल, लयबद्ध थिरकणारी पावलं अन् रसिकांनी टाळ्यांची दिलेली दाद…अशा प्रसन्न आणि तेजोमय वातावरणात विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी अमृत२०२२ वार्षिक स्रेहसंमेलन उत्साहात पार पडले. संस्कृतीक कार्यक्रमाकरीता प्रमुख उपस्थिती मध्ये दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, सौ. जयमाला गायकवाड, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख तथा वार्षिक स्नेह संमेलन प्रभारी प्रा. डॉ. सुनील साळुंके, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. अशोक वाघमारे, डॉ. सुभाष कदम, लेफ्टनंट विवेक झंपले, नवनाथ भालेराव,
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.