27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरजेईई मेन्स् परीक्षेत दयानंद विज्ञानची भरारी

जेईई मेन्स् परीक्षेत दयानंद विज्ञानची भरारी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय पातळीवर आयआयटी/नीट स्तरांच्या प्रतिष्ठित कॉलेज मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी झालेल्या जेईई मेन्स् परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये आदित्य अशोक पवार या विद्यार्थ्याने ९८.२९७ पर्सेन्टाइल मार्क मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक, आदित्य विकास पाटील या विद्यार्थ्याने ९७.२६७ पर्सेन्टाइल मार्क मिळवित व्दितीय, तर वळसे विश्वजीत राजाभाऊ या विद्यार्थ्याने ९६.५१६ पर्सेन्टाइल मार्कासह तृतीय येण्याचा मान मिळवीला आहे. ओंकार प्रकाश शिंदे या विद्यार्थ्याने ९६.२०६ पर्सेन्टाइल मार्क मिळविले आहेत. या निकालामध्ये महाविद्यालयाचे २० विद्यार्थी ९० पर्सेन्टाइलच्या पुढे आहेत. तर ८० पर्सेन्टाइल पुढे ३२ विद्यार्थी आहेत. या वर्षीपासून जेईई मेन्स् ही परीक्षा वर्षातून दोन वेळेस घेतली जात आहे. दोन्ही परीक्षेत सर्वात जास्त गुण ज्या परीक्षेत मिळतील ते गुण हे प्रवेशासाठी गृहीत धरले जाणार आहेत.

या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललीतकुमार शहा, रमेश राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, संजय बोरा, डॉ. चेतन सारडा, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. मिलिंद माने, प्रा. हेमंत वरुडकर, यू. के. झुंजारे, प्रा. रवी कुमार, प्रा. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, कोराळे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कौतुक केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या