26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरमराठवाड्यात दयानंद शिक्षण संस्था अव्वल स्थानावर

मराठवाड्यात दयानंद शिक्षण संस्था अव्वल स्थानावर

एकमत ऑनलाईन

लातूर : दयानंद महाविद्यालयाच्या या दैदिप्यमान निकालाच्या गुणवत्तेची परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी कायम राखली असून यामुळे संपूर्ण मराठवाड्यात दयानंद शिक्षण संस्था अव्वल स्थानी असुन भविष्यातही राहण्याचा प्रयत्न संस्थेचा असणार आहे, असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी केले. दयानंद शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील १२ वी बोर्ड परिक्षेत टॉपर आलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार व रोख पारितोषिक वितरण समारंभ दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, शालेय समितीचे सदस्य बाल किशन बांगड, दीनानाथ भुतडा, विशाल लाहोटी विशाल अग्रवाल, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, विधि महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. पूनम नाथानी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते, आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती पटवारी, फार्मसी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला, डॉ. रोहिणी हवा, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप जगताप, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, उपप्राचार्य डॉ. अनिल माळी, पर्यवेक्षक प्रा. डॉ. मिंिलद माने, पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे, पर्यवेक्षक प्रा. हेमंत वरुडकर, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, समन्वयक प्रा. सुभाष मोरे, उपस्थित होते.

पुढे बोलताना लक्ष्मीरमण लाहोटी यांनी गरीब व होतकरु विद्यार्थी हे आर्थिक कारणासाठी शिक्षणापासून वंचित रहाणार नाहीत. त्यांना दयानंद शिक्षण संस्था मदतीचा हात देईल, अशी ग्वाही देवुन भविष्यात दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालये गुणवत्तेची परंपरा कायम ठेवतील यापेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थी यश मिळवतील अशि अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन करून गुणवंतांना पुढील शिक्षणासाठी शुभेछा दिल्य. यावेळी रमेश बियाणी यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कार सोहळ्यात दयानंद विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी पालक यांचा रोख पारितोषिक देवुन गौरव करण्यात आला तसेच दयानंद विज्ञान महाविद्यालयाची प्रथम आलेली ईश्वरी शिरुरे पाटील तिचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. अंजली बुरांडे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. ईश्वरप्रसाद बिदादा, प्रा. सुवर्णा कारंजे, प्रा. सुभाष मोरे, डॉ. संदीप जगदाळे, प्रा. बळवंत सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या