22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरकर्जबाजारी शेतक-याचे विहिरीत प्रेत

कर्जबाजारी शेतक-याचे विहिरीत प्रेत

एकमत ऑनलाईन

देवणी : देवणी तालुक्यातील इस्मालवाडी शेत शिवारात ऐन बैलपोळा दिवशीच म्हणजे शुक्रवारी दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी कर्जबाजारी शेतकरी सोमनाथ विरभद्र पाटील वय ३४ वर्षे यांचा स्वत:च्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गावात बैलपोळा सणावर शोककळा पसरली. शेतकरी सोमनाथ पाटील यांना चार एक्कर शेती असून त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दिड ते दोन लाख रुपयांचे कर्ज व तसेच सावकारीतून घेतलेला एक ते दिड लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यात अतिवृष्टी व गोगलगाय गायीनी खरीपाचे पिक होत्याचे नव्हते केले. परिणामी आता जगायचे कसे या विवंचनेत असलेल्या मयत सोमनाथ पाटील यांनी नैराश्यातून सोमवारी स्वत:च्या विहिरीत अंगाला दगड बांधून उडी घेतली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारपासून ते बेपत्ता होते, अशी माहिती ग्रामस्थांच्या चर्चेतून समोर आली आहे.

सोमनाथ पाटील यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती. असे शेतक-यांचे म्हणणे आहे. सदरील घटना उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी देवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंगारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डोंगरे व पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केल. घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आला. मयतावर शोकाकुल वातावरणात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात आक्समिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या