27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरवाळू माफियाकडून शेतक-यावर जीवघेणा हल्ला

वाळू माफियाकडून शेतक-यावर जीवघेणा हल्ला

एकमत ऑनलाईन

किल्लारी : येथे वाळुमाफीयाची दशहत निर्माण झाली आहे. नदी काठावरील शेतातील वाळु आरेरावी करून घेऊन जात आहेत. एका शेतक-याने त्यास विरोध केला असता शेतक-यावर ट्रॅक्टर खाली पाडून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.

किल्लारी येथील शेतकरी पिता-पुत्राने शेतातील दरडीची वाळू खणून घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे मुलगा रामानंद ( राम ) यास मारहाण करून आडवे पाडले व ट्रॅक्टरवरून घातले त्यामुळे पोट, हात, डोक्यास गंभीर मार लागला. यात ते जखमी झाले. या प्रकरणी अरोपी महादू शशीकांत पांढरे, सुधाकर सहदेव दंडगुले, दिलीप दंडगुले, मधुकर दंडगुळे या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी तीन अरोपींना अटक करण्यात आली आहे. शेतकरी बाळु बिराजदार हा किल्लारी येथील तेरणा नदी काठावरील सर्वे नं १९८ मधील शेतात काम करीत आसताना वाळु तस्करी करणारे, महादू शशिकांत पांढरे, सुधाकर सहदेव दंडगुले, दिलीप दंडगुले, मधुकर दंडगुले यानी संगनमत करून फि­र्यादीच्या शेतातील दरडमधील वाळु नेत आसताना फिर्यादी शेतक-यांने अडविले आसता अरोपी महादु पांढरे व दिलीप दंडगुले यानी शिवीगाळ करुन तुझ्या बापाची जागा आहे का वाळु घेऊन जाणार तुला काय करावयाचे ते कर आडवे आलास तर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालून तुला ठार मारु असे म्हटले.

यानंतर शेतकरी बाळू बिराजदार याने आपला मुलगा रामानंद (राम ) यास फोन करून बोलावून घेतले. मुलाने असे का करता म्हणून विचारले आसता अरोपीने शिवीगाळ करून सुधाकर दंडगुले यानी मुलाच्या गच्चीस धरून वाळू का घेऊन जाऊ देत नाहीस म्हणून मारहाण केली भांडणाचा आवाज ऐकून शेजारचे बलभीम घोटाळे व विशाल आंदुडगे याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला आसता अरोपी महादू पांढरे याच्या मोबाईलवर अरोपी ने मि मधुकर दंडगुले बोलतोय ट्रक्टर माझा आहे जाऊदे नाही तर तुला खलास करतो, अशी धमकी दिली.

सुधाकर दंडगुले व दिलीप दंडगुले यानी फिर्यादीच्या मुलास तू तलाटी व तहसीदार यांना फोन का? केला म्हणून गच्चीला धरुन आवळले व महादु पाढरे याने त्याला टॅक्टर खाली घालून मारहाण करुन पळून जा तलाठी येत आहे तेव्हा रामानंद ( राम ) याने ट्रॅक्टरची चावी घेण्याचा प्रयत्न केला आसता रामानंदच्या कमरेवर लाथ मारून खाली पाडले व जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर ट्रॅक्टर घालून पळुन गेला त्यामळे पोटावर, हाताला, डोक्यास मार लागून गंभीर जखमी केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. जखमीवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनी सुनील गायकवाड हे करीत आहेत. पोलिसानी या प्रकरणी पालिसांनी तीन अरोपींना अटक केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या