Tuesday, September 26, 2023

धक्कादायक : लातूरात कोरोनाग्रस्त दोघांचा मृत्यू; आणखी ६ पॉझिटिव्ह

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेले औसा व लातूर शहरातील प्रत्येकी एक अशा २ कोरोनाग्रस्त रुग्णांचा दि़ १० जून रोजी मृत्यू झाला़ सदर दोन्ही रुग्ण किडनी, उच्च रक्तदाब, मधुमेह व निमोनिया आदी आजाराने त्रस्त होते. लातूर जिल्ह्यातील एकूण ५६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ४१ निगेटिव्ह, ६ पॉझिटिव्ह, ७ प्रलंबित तर २ इन्कक्ल्यूसीव आले आहेत़

उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा दि़ १० रोजी (मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान) मृत्यू झाला असून हा रुग्ण दि़ २ जून रोजी ८ दिवसांपूर्वी सोलापूर येथून प्रवास करून आल्यामुळे त्यांना भूक लागत नव्हती, अशक्तपणा येत होता त्यामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुग्ण औसा येथील कादरीनगर येथील असून त्यांना पूर्वीपासूनच किडनीचा आजार, उच्च रक्तदाब व मधुमेह होता़ त्यांचे २ वेळा डायलिसीस करण्यात आले होते. सदर रुग्ण दाखल  झाल्यापासून आॅक्सिजन सर्पोर्टवर होता़ त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तसेच दि़ १० जून रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण दि़ २८ मे रोजी या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुग्ण मोतीनगर, लातूर येथील असून कुटुंबातील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोना (कोविड-१९) ची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासुन ते आॅक्सिजन सर्पोर्टवर होते.

दि़ ४ जूनपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. कोरोनामुळे त्यांना निमोनिया झाला होता व अगोदरपासूनच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान सायंकाळी ५़३० वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती औषध निर्माणशास्त्र विभागाचे सहायक प्रा़ डॉ. राजेश बोबडे व कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकूण २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी १६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी २ व्यक्ती लातूर शहरातील असून १ व्यक्ती उस्मानपुरा येथील आहे व दुसरी व्यक्ती हत्तेनगर येथील आहे. एक व्यक्ती उदगीर येथील सराफ लाईन येथील आहे व दुसरी व्यक्ती अंदोरा औसा येथील आहे. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथून ४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

२४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते़ : औसा येथून २४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते़ त्यापैकी २२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०२ व्यक्तींचे अहवाल इन्कक्ल्यूसीव आले आहेत. कोविड केअर सेंटर, लातूर येथून ४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. असे एकूण ५६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ४१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह, २ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, ७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

लातूर जिल्ह्यात आणखी ६ पॉझिटिव्ह

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत
दि़ १० जून रोजी लातूर जिल्ह्यातील एकूण ५६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ४१ निगेटिव्ह, ६ पॉझिटिव्ह, ७ प्रलंबित तर २ इन्कक्ल्यूसीव आले आहेत़

शहरातील ५ ठिकाणे सील : शहरातील मोतीनगर, सौभाग्यनगर, खाडगाव रोड व क्रांतीनगर येथे प्रत्येकी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दि़ ९ जून रोजी आढळून आला त्यानंतर तातडीने महानगरपालिकेने उपरोक्त सर्व ठिकाणे सील (कन्टेंटमेंट झोन)करून त्या भागांत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली़ शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी आता अधिक सावध, सतर्क आणि सुरक्षित राहाणे आवश्यक आहे.

मोतीनगर प्रभाग क्रमांक १६ मध्ये मंगळवारी १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या भागातील १८ घरे व ८४ लोकसंख्या असलेला भाग सील केला़ मनपा आयुक्त देविदास  टेकाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उपायुक्त सुंदर बोंदर, उपायुक्त हर्षल गायकवाड, पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांनी भेट देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी व त्यांच्या सहकाºयांनी कंटेन्मेट झोनमध्ये तातडीने सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली़ सर्व्हे करून सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली़ दरम्यान याच मोतीनगरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे आणखी एक घर लेबर कॉलनी पोलिस क्वार्टरमध्ये आहे त्यामुळे पोलिस क्वार्टरचा परिसरही सील करण्यात आला आहे.

त्यामुळे सौभाग्यनगरचा भागही सील…. :खाडगाव रोडच्या पूर्व दिशेला असलेल्या सौभाग्यनगरमधील एका डॉक्टरांच्या घरी भाड्याने चौघे जण राहतात़ त्यातील वाहनचालक कारोना पॉझिटिव्ह आढळला आहे त्यामुळे सौभाग्यनगरचा भागही सील करण्यात आला आहे़ खाडगाव रोडवरीलही एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा भागही सील केला आहे़ हा व्यक्ती मुंबईहून आल्याचे सांगण्यात येते़ त्यास किडणी आणि इतर आजार असल्याचेही सांगण्यात आले़ खाडगाव रोडच्या पश्चिम दिशेला असलेल्या क्रांतीनगरमध्येही एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे त्यामुळे हा भागही सील करण्यात आला आहे

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या