19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरलातूर शहर महानगरपालिकेची दशकपुर्ती

लातूर शहर महानगरपालिकेची दशकपुर्ती

एकमत ऑनलाईन

लातूर (एजाज शेख) : साधारणत: ६१ वर्षे अस्तित्वात असलेल्या लातूर नगर परिषदेचे दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी लातूर शहर महानगरपालिकेत रुपांतर झाले. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दुरदृष्टी नेतृत्वात लातूर शहर महानगरपालिका झाली. आज दि. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी या महानगरपालिकेची दशकपुर्ती आहे. मागच्या दहा वर्षांत महानगरपालिकेत राजकीयदृष्ट्या असंख्य चढ-उतार, नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र एक पालकसंस्था म्हणून लातूर महानरपालिकेने निभावलेली दहा वर्षातील भूमिका निश्चितच अभिमानास्पद आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महानरगपालिके मार्फत विकासाची घोडदौड सुरु झाली आणि शहरातील नागरिकांचे जगणे सुस करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच आज शहरात विविध सुविधा दृष्टीपथात आल्या आहेत.

लातूर महानगरपालिकेच्या निर्मितीनंतर पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहराच्या विकासाला एक नवा आयाम प्राप्त झाला. नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने लातूर शहराच्या विकसाचा यज्ञ अखंडपणे सुरुच आहे. गेल्या १० वर्षांत लातूर शहर महानगरपालिकेने रस्ता अनुदान, अल्पसंख्यांक विभागाचे अनुदान, १३ वा वित्त आयोग, १४ वा वित्त आयोग, महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना (राज्य स्तर), महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना (जिल्हा स्तर), तातडीची पाणीपुरवठा योजना (टंचाई), दलीत वस्ती पाणी पुरवठा योजना, पाणी पुरवठा विशेष योजना, स्थानिक विकास निधी (आमदार), दलीत वस्ती सुधार योजना, महिला व बालकल्याण, स्वच्छता योजना, नागरी दलित्तेतर योजना, राजीव आवास योजना, अग्निशमन बळकटीकरण, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, मुलभूत सोयी, सुविधा विकास कामासाठी विशेष अर्थ सहाय्य, महानगरपालिका क्षेत्रात प्राथमिक सोयी, सुविधांच्या कामासाठी विशेष अनुदान, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छ भारत मिशन, पर्यटन विकास, नाविण्यपुर्ण योजना, स्थानिक विकास निधी (खासदार), अमृत योजना, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, दिव्यांग कल्याण, दीनदयाल अंत्योदय योजना, फेरीवाला धोरण, कुष्ठ रुग्णांचे मानधन, कर्मचारी, अधिकारी कल्याण योजना, सिटी बस, महिलांना मोफत प्रवास, कोविड लसीकरण, उमेद अभियान, पथदिवे, घन कचरा व्यवस्थापन, पथदिवे, सीसीटीव्ही, वाहतूक सिग्नल, वृक्षारोपन, वृक्षसंगोपन, अपारंपारी उर्जा, मलनि:सारण प्रकल्प आदी योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करुन पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या.

१४ व्या वित्त आयोगाची सुरुवात सन २०१५-१६ पासून झाली. तेव्हापासून आजपर्यंत लातूर शहर महानगरपालिकेला १४ व्या वित्त आयोगातून १३६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतूून ५० टक्के घन कचरा व्यवस्थापनावर तर ५० टक्के इतर विकास कामांवर खर्च करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना (राज्य स्तर) या योजनेतून लातूर महानगरपालिकेला आजपर्यंत ९५ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून शहरातील ३० व ४० फुटांचे रस्ते करण्यात आले. मनपाच्या विद्यूत विभागाच्या वतीने शहरात ईएसएलद्वारे विद्युतीकरण करण्यात आले. इतरही विविध योजनांतून मोठ्याप्रमाणात निधीची उपलब्धता झाली असुन त्यातूनही पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या.

दहा वर्षांतील महापौर व त्यांचा कार्यकाळ
प्रा. डॉ. स्मिता खानापूरे – २१ मे २०१२ ते २० नोव्हेंबर २०१४.
अख्तर मिस्त्री -२१ नोव्हेंबर २०१४ ते २० एप्रिल २०१६.
अ‍ॅड. दीपक सुळ – १२ मे २०१६ ते २० मे २०१७.
सुरेश पवार – २२ मे २०१७ ते २२ नोव्हेंबर २०१९.
विक्रांत गोजमगुंडे – २२ नोव्हेंबर २०१९ ते आजतागायत.

दहा वर्षांतील स्थायी समितीचे सभापती
अ‍ॅड. समद पटेल
राम कोंबडे
अख्तर मिस्त्री
पप्पू देशमुख
विक्रांत गोजमगुंडे
अशोक गोविंदपूरकर
शैलेश गोजमगुंडे
दीपक मठपती

दहा वर्षांतील आयुक्त व त्यांचा कार्यकाळ
रुचेश जयवंशी- ७ जुन २०१२ ते १४ डिसेंबर २०१२
डी. डी. जावळीकर- १४ डिसेंबर २०१२ ते १२ जून २०१३
सुधाकर तेलंग – १२ जुन २०१३ ते ९ ऑगस्ट २०१६
पांडूरंग पोले – ९ ऑगस्ट २०१६ ते २ सप्टेंबर २०१६
रविंद्र पांढरे – २ सप्टेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६
रमेश पवार – १ ऑक्टोबर २०१६ ते १६ मे २०१७
जी. श्रीकांत -१६ मे २०१७ ते २५ ऑक्टोबर २०१७
अच्युत हंगे- २५ ऑक्टोबर २०१७ ते ९ मार्च २०१८
कौस्तूभ दिवेगावकर- ९ मार्च २०१८ ते २८ मे २०१८
जी. श्रीकांत – २८ मे २०१८ ते ४ जून २०१८
कौस्तूभ दिवेगावकर – ४ जून २०१८ ते २० फेबु्रवारी २०१९
एम. देवंद्र सिंह २८ फेबु्रवारी २०१९ ते १४ फेबु्रवारी २०२०
जी. श्रीकांत – १४ फेबु्रवारी २०२० ते २६ मे २०२०
देविदास टेंकाळे- २६ मे २०२० ते २७ जानेवारी २०२०
अमन मित्तल- २७ जानेवारी २०२० ते आजतागायत

ऐतिहासीक गंजगोलाईचे सुशोभीकरण
लातूर शहरातील गंजगोलाई या ऐतिहासीक वास्तूला १०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने नागरी दलित्तेतर वस्ती योजनेअंतर्गत गंजगोलाईचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यावर २ कोटी २० लाख ५३ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्यात इमारतीचे मजबुतीकरण, पुर्व, पश्चिम, दक्षीण व उत्तर दिशांचे प्रवेशद्वारांचे दगडी बांधकाम, गंजगोलाई व्यापारी संकुलाचे कॉलम मजबुतीकरण व पर्दी जुना गिलावा काढून कॉलम व पर्दीला नवीन डिझाईन प्रमाणे काम, गंजगोलाई व्यापारी संकुलाचे पूर्ण छताचे वॉटर प्रुफिंग, गंजगोलाई व्यापारी संकुलाच्या आतील व बाहेरील बाजुस कोटा फरशी, गंजगोलाई व्यापारी संकुलात विद्यूत पुरवठा सुरळीत करणे व गंजगोलाई इमारतीस रंगरंगोटी आदी कामे करण्यात आली. या कामानंतर गंजगोलाईचे रुपडे बदलून गेले आहे. गंजगोेलाई सुशोभीकरण लोकार्पणाचा शानदार सोहळा विजयादशमीच्या दिवशी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या