24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर औसा मतदारसंघातील ६८ गावांच्या विकास कामांबाबत निर्णय

औसा मतदारसंघातील ६८ गावांच्या विकास कामांबाबत निर्णय

एकमत ऑनलाईन

निलंगा : औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंगा येथे दि.२३ जून रोजी मंगळवारी निलंगा तालुक्यातील औसा मतदारसंघात येणा-या ६८ गावांतील विकासकामांसंदर्भात आढावा बैठक घेत महत्त्वाचे निर्णय घेतले.

या बैठकीत आमदार पवार यांनी ६८ गावांच्या विकासकामांसंदर्भात आणि त्या गावांमधील शेतकरी बांधवांच्या विविध समस्यांसंदर्भात व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ६८ गावांमध्ये वृक्षक्षेत्र वाढविण्याचे व त्यासाठी वृक्ष लागवडीचा बिहार पॅटर्न राबविण्याचे, बंद पडलेले रोहित्र व वाकलेले विद्युत पोल तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित विभागांना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले.

गावोगावी चांगले पाणंद रस्ते निर्माण करण्यासह प्रत्येक गावात दहनभूमी व दफनभूमी बांधण्यासंदर्भात उचित कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. सार्वजनिक व वैयक्तीक विहिरींचे प्रस्ताव मंजुरीसाठी अडकून पडले असल्याचा मुद्दा उपस्थित करून सदरील प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यात यावी अशी मागणीही यावेळी केली.

आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील विकास कामांच्या दुष्टीकोनातून विविध खात्यातून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून यामुळे मतदारसंघातील विकास कामांना गती मिळत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांसाठीही त्यांनी पाठपुरावा केला असून येणाºया काळात मतदारसंघाचा कायापालट केला जाणार
असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी कॅबिनेट मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, कासार सिरसी भाजप मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे व संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read More  कोविफोर औषधाची एक बाटलीची किंमत ५ हजार ४०० रुपये

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या