31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरदिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय

दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्य शासन व जिल्हास्तरावरुन कोरोना प्रार्दभाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रार्दूभाव व रुग्ण संख्या विचारत घेता यावर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासनाने मार्गदर्शक सूचना विहीत केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनाच्या अंमलबजावणीत्सव जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी फौजदारी प्रकीया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत साजरा करावयाच्या दिपावली उत्सवासंदर्भात पुढीलप्रमाणे आदेश जाहीर केले आहेत.

लातूर जिल्ह्यामध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. विद्यमान वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रार्दूभाव विचारात घेऊन गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण, उत्सव अंत्यत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रीत न येता साजरे केली आहे. यावर्षीचा दिपावली उत्सव कोविड कालावधीत साज-या केलेल्या अन्य उत्सवाप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेले राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टींगचे पालन करावे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.

दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशांचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाकेची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्याच्या तसेच प्राणीच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर ब-याच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्याच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी विद्यमान वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्याचा त्रास होऊ शकतो त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा. याउत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबूक इत्यादी माध्यमाद्वारे त्याचे प्रसारण करावे.

संस्कृतीक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे आयोजित करण्यात प्राधान्य द्यावे आणि कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजाराने त्याचे आणि त्यांचे प्रतिबंधात्क उपाय तसेच स्वच्छताबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्याठिकाणी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येऊ नये, याची दक्षता घ्यावी. कोविड-१९ याचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूर्नवसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच याआदेशानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास याचेही अनुपालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समूह,भारतीय दंडसंहिता १८६० साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. परंतू आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुद्ध कार्यवाही केली जाणार नाही.

पाटोदा येथील शेतक-याचा ऊस व साहित्य जाळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या