Sunday, September 24, 2023

रेणा मध्यम प्रकल्पाच्या पातळीत घट

सिध्दार्थ चव्हाण रेणापुर : पावसाळा सुरू होऊन दिड महिना झाला असला तरी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील निम्या गावांची तहान भागवणा-या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात उन्हळयात मे महिन्या असलेल्या पाणीसाठयातच ऐन पावसळयात घट झाली आहे. सध्या प्रकल्पात केवळ ११ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळ योजनां अवलांबुन आहेत. गत वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवणार अशी भिती व्यक्त केली जात असतानांच अचानक गत वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसाने दिलासा दिला होता़ एका आठवड्यातच रेणा मध्यम प्रकल्पात ९ .८३१ दश लक्ष घन मिटर म्हणजेच ४७.८३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता. तर गत मे महिन्यात रेणा मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

या वर्षी रेणापुर तालुक्यात जून मध्ये मृग नक्षत्रात पाऊसास प्रारंभ झाला़ पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकºयांंनी खारीपाच्या पेरण्या केल्या़ सध्या तालुक्यात पिकांसाठी पोषक आसा पाऊस झाल्याने पिके बहरली आहेत़ मात्र गत दिड महिन्यत दमदार पाऊस न झाल्याने आजही नदी, नाले, ओढ वाहिली नसुन कोरडे ठाक आहेत. तसेच निम्या तालुक्याची तहान भागवणाºया रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ही मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही़ उलट मे महिन्या असलेल्या १४ टक्के पाणीसाठयातुन २ टक्के पाण्याची घट झाली आहे. सध्या रेणा प्रकल्पात ६०५ .५० आरएल म्हणजेच ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध असुन नागरिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दमदार पावसाची गरज
रेणापूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या रेणा मध्यम प्रकल्प पाणीसाठा होण्यासाठी दमदार पावसाची गरज असुन २ महिने पावसाळा शिल्लक आह़ या काळात प्रकल्पात पाणीसाठा होईल, अशी अपेक्षा नागरीकातुन केली जात आहे.

Read More  अवाजवी बिले आकारणाºया रुग्णालयांवर करडी नजर

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या