27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात ११ तलावातील पाणी पातळीत घट

जळकोट तालुक्यात ११ तलावातील पाणी पातळीत घट

एकमत ऑनलाईन

जळकोट : तालुक्यामध्ये सन २०२१ च्या पावसाळ्यात खूप आणि सलग पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील सर्व साठवन तलाव, पाझर तलाव, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते परंतु या उन्हाळ्यामध्ये अनेक साठवण तलावातील पाणी पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे .तालुक्यातील जंगमवाडी साठवण तलावातील पाणीसाठा ज्योत्या खाली आहे, तर हावरगा लघु प्रकल्पातील पाणी पातळीचिंंताजनक परिस्थितीत असून जवळपास या तलावातील पाणी साठा संपला आहे. तर जळकोट शहराला पाणीपुरवठा होणा-या माळहिप्परगा साठवण तलावात मात्र ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

या वर्षीचा पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन आठवडे उलटले आहेत तरीही जळकोट तालुक्यात म्हणावा तेवढा पाऊस पडला नाही. अशीच परिस्थिती राहिली तर जळकोट तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जळकोट तालुक्यातील साठवण तलावांतील पाणी पातळी पाहता. सोनवळा १.२१ टक्के, हळदवाढवणा-१०.२८ टक्के, जंगमवाडी-ज्योत्याखाली ,डोंगरगाव- २० टक्के, माळहिपरगा-३०.३९ टक्के, रावणकोळा- १८ टक्के, केकतशिं्ांदगी- ४५ टक्के, ढोरसांगवी- ज्योत्याखाली, चेरा ११.७५ टक्के, चेरा २.१७ टक्के, गुत्ती १२.६२, गुत्ती- २ – २२. ८५ टक्के, धोंडवाडी १६. ७१ टक्के, तर जळकोट तालुका शेजारी असलेल्या तिरु मध्यम प्रकल्पात 26 टक्के पाणीसाठा शिाल्लक आहे .
जळकोट तालुक्यातील साठवण तलाव शंभर टक्के भरूनही जून महिन्यामध्ये पाणी पातळी खालावली आहे. यावर्षी शेतक-यांनी पूर्वीपेक्षा चारशे एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे .पूर्वी बाराशे एकर क्षेत्र ऊस लागवडीचे होते तर यावर्षी यामध्ये ४०० हेक्­टर उसाची वाढ होऊन सोळाशे हेक्टर क्षेत्र उसाचे झाले आहे. यामुळे ऊसाला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होऊ लागला आहे तसेच यावर्षी अनेक शेतक-याचा ऊस उशिरा गेल्यामुळे त्या शेतक-यांना नाईलाजास्तव जास्तीचे पाणी ऊसाला द्यावे लागले. याचाही परिणाम पाणीसाठा कमी होण्यावर झाला. तसेच यावर्षी उन्हाचा तडाखा अधिक होता यामुळे बाष्पीभवनही वेगाने झाले. याचा परिणामही पाणीपातळी कमी होण्यामध्ये झाला. जळकोट तालुक्यात माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून माजी आमदार स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांनी मोठ्या प्रमाणात साठवण तलावासाठी निधी आणला होता. या साठवण तलावामुळे डोंगरावर हिरवळ फुलली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या