रेणापूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर तालुक्यातील निवाडा आणि बावची येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यापुढेही विविध विकासकामे गावात आणि मतदारसंघात आणण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
रेणापूर तालुक्यातील बावची येथे ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला तसेच, पाझर तलाव दुरुस्ती, गावांतर्गत नालीकाम, सिमेंट रस्ता, पेव्हर ब्लॉक रस्ता, दलीत वस्तीत विद्युतीकरण, या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर निवाडा येथेही पेव्हर ब्लॉक, क्राँक्रीट रस्ता, पुल अशा विविध विकासकामांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ करण्यात आला व ग्रामस्थांशी संवाद साधला.
राज्य सरकार आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या विकासाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. विकासाची ही गती आपल्याला कायम ठेवायची आहे. त्यामुळे येणा-या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकीत आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाला भरघोस आशीर्वाद द्यावा, असे आवाहन आमदार धिरज देशमुख यांनी केले.
यावेळी रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लातूर जि.म.बॅकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, माजी संचालक विश्वास देशमुख, माजी उपसभापती उमाकांत खलंग्रे, माजी सभापती भाग्यरथी बनसोडे, बाळकृष्ण माने, शहराध्यक्ष मतीन अली सय्यद, महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्ष पुजा इगे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंत पवार, माजी संचालक प्रकाश सूर्यवंशी, कॉग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आबासाहेब बनसोडे, माजी जि.प. सदस्य उद्धव चेपट, संगायो समितीचे अध्यक्ष गोंिवद पाटील, सरपंच प्रभाकर केंद्रे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नंदकुमार साळुंके, दिलीप उरगुंडे, सरपंच बालासाहेब बनसोडे,उपसरपंच महादेव कुंडूळे, श्रीनिवास आकनगिरे, बळीराम साळुंके,अशोक उरगुंडे,बावचीच्या सरपंच कल्पनाबाई देशमुख, तानाजी देशमुख, प्रशांत माने,आशादुल्ला सय्यद, शेषेराव हाके, विश्वास पाटील , बाळासाहेब करमुडे आदी उपस्थित होते.