27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरऔशात विकासकामांचे ४ जून रोजी लोकार्पण

औशात विकासकामांचे ४ जून रोजी लोकार्पण

एकमत ऑनलाईन

औसा : केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दि. ४ जून रोजी औसा येथील उटगे मैदानावर ‘शेत तिथे रस्ता व मनरेगातून ग्रामसमृद्धी’ अभियानांतर्गतच्या कामांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री भगवंत खुबा उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजपचे औसा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे औसा नगरपरिषदेचे माजी गटनेते सुनील उटगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमाशंकर राचट्टे हे उपस्थित होते.यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा पॅटर्न अंतर्गत झालेल्या कामांची माहिती देत औसा विधानसभा मतदारसंघात एक हजार किलोमीटरचे शेतरस्ते, एक हजार जनावरांचे गोटे व बाराशे हेक्टरवरील फळबाग लागवडीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याचे सांगून. औसा विधानसभा मतदारसंघातील शेतक-यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने शेतक-याना शेतरस्ते, वीज व पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचा व्यापक दृष्टिकोन ठेवून देशात प्रथमच आमदार फंडातून शेतरस्ते ही संकल्पना राबविली. आणि २१ जानेवारी २०२१ ला मतदारसंघात शेतरस्ते अभियानाची सुरुवात केली. या अभियानातून अवघ्या ११ महिन्यात प्रशासन व शेतक-याच्या सहकार्याने एक हजार किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामाचा टप्पा गाठत आहेत.

या अभियानाच्या पुढील टप्प्यात मतदारसंघातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या रोहित्रीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणेकरुण गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना अखंडितपणे सुरू राहील त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे. शेतक-यांच्या रोहित्रीची क्षमता वाढ केली जाणार आहे. आमदार फंडातून शेतक-याच्या रोहित्रीची क्षमता वाढ करणार आहे.

ज्यामुळे शेतक-यांंना उच्च दाबाने वीजपुरवठा व्हावा. शेतक-यानी मनरेगाच्या योजनेतून फळबाग लागवडीतून शाश्वत उत्पन्न, शेततळेच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय, गांडूळ व कंपोस्ट खत योजनेतून कृत्रिम खत तर गोठा योजनेतून सुरक्षित जनावरांना आसरा यासह २७ विविध योजनेतून शंभर टक्के अनुदानीत योजनेचा फायदा घेणे आवश्यक आहे. या योजनेसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे.केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ४ जून रोजी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी लोकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या