26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूर‘त्या’ २१ शिक्षकांचे वेतन रोखा

‘त्या’ २१ शिक्षकांचे वेतन रोखा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी २०१९) मध्ये झालेल्या गैर प्रकारात लातूर जिल्हयातील प्राथमिक शाळांचे ७, तर माध्यमिक शाळांचे १४ असे २१ शिक्षकांचा समावेश असल्याचे प्रकरण तपासणीनंतर समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण संचालक पुणे यांच्या आदेशानुसार जिल्हयातील २१ शिक्षकांचे ऑगस्ट २०२२ पासून वेतन बंद करण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी वेतन अधिक्षकांना दिले आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) २०१९ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत गैरप्रकार झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तपास होऊन टीईटी परिक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी जाहिर झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. लातूर जिल्हयातील ७ प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा ७ शिक्षकांचा टीईटी गैर प्रकरणात समावेश आहे. विषेश म्हणजे यात ५ उर्दु व २ मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक आहेत. या शिक्षकांचा ऑगस्ट २०२२ पासून वेतन रोखा असे आदेश प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी वेतन अधिक्षक व मुख्याध्यापकांना दिले आहेत.

तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील माध्यमिकच्या ११ शाळेतील १४ शिक्षण सेवक, सहशिक्षक पदावर कार्यरत असलेले, टीईटी गैर प्रकारात दोषी असलेले शिक्षक हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहेत. या १४ शिक्षकांचे पुढील आदेशापर्यंत शालार्थ आयडी गोठविणयात आलेले असून ऑगस्ट २०२२ पासून त्स्याांचे वेतन रद्द करावे. या शिक्षकांना ऑनलाईन अथवा ऑफ लाईन वेतन अनुदान न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या