23.3 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

दीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या संकटकाळात सौ. दीपशिखा धिरज देशमुख या रुग्णांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्यांनी दैविक फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरजही वाढत आहे. अनेक भागात ऑक्सिजनचा तुटवडासुद्धा पडत आहे. या पार्श्वभूमीवर सौ. दीपशिखा धिरज देशमुख या रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यांनी दैविक फाउंडेशनच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करुन दिले असून यातील १२ नंबर पाटी येथील कोविड केअर सेंटरमध्ये २, बावची कोविड केअर सेंटरमध्ये२ तर पोहरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात देण्यात आलेले हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फिलिप्स कंपनीचे असून ते अत्यंत दर्जेदार स्वरुपाचे आहेत.

यापुढेही अशा प्रकारच्या आरोग्यविषयक मदतीसाठी आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या प्रयत्नातून आपण नक्कीच कोरोनावर मात करु शकू, अशा भावना सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी व्यक्त केल्या.

पुन्हा ऑक्सिजन भरण्याची गरज नाही
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे हवेतील ऑक्सिजन विशिष्ट पद्धतीने साठवण्याचे यंत्र आहे. यामध्ये हवेतील नायट्रोजन बाजूला करुन ऑक्सिजनची घनता वाढवली जाते. हे विजेवर चालणारे यंत्र असून हवेतून ऑक्सिजन मिळवून देते. या यंत्रासाठी सिलिंडरसारखे पुन्हा ऑक्सिजन भरण्याची गरज नाही. त्यामुळे अडचणी काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे अत्यंत उपयोगी यंत्र म्हणून त्याकडे पाहिले जाते.

म्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड, विशेषज्ञांचे पथक नेमा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या