27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूर१९ गावांतून २० अधिग्रहणाची मागणी

१९ गावांतून २० अधिग्रहणाची मागणी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने जिल्हयात एप्रिल अखेर पर्यंत पाणी टंचाई जानवली नाही. मात्र मे महिना उजाडताच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी म्हणून जिल्ह्यातील १३ गावांसाठी व ६ वाडया, तांड्यावरील नागरिकांसाठी पाणी मिळावे म्हणून पंचायत समिती स्तरावर २० अधिग्रहाणाची मागणी करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरी ६९३.२५ मिमी पाऊस पडतो. तो गेल्यावर्षी ९७२.३ मिमी इतका पाऊस झाला होता. जिल्ह्यात गेल्यावर्षी जून महिना अखेर पर्यंत पाणी टंचाईच्या झळा जाणवल्या. पावसाळ्यात ब-याच ठिकाणी सम विषम स्वरूपात पाऊस झाला होता, असे असले तरी जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी टंचाई संपुष्टात येऊन ग्रामीण भागातील नागरीकांनाही दिलासा मिळाला होता.

जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी एपिल अखेर पर्यंत जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र मे उजाडताच ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीकडून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील १३ गावांसाठी व ६ वाडया, तांडयावरील नागरिकांसाठी पाणी मिळावे म्हणून पंचायत समिती स्तरावर २० अधिग्रहाणाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

यात लातूर तालुक्यातील कृष्णनगर तांडयासाठी १ अधिग्रणांची मागणी, निलंगा तालुक्यातील हंद्राल गावासाठी २ अधिग्रहणांची मागणी, उदगीर तालुक्यातील तिवटघ्याळ, कुमदल हेर गावांसाठी २ अधिग्रहणांची मागणी, जळकोट तालुक्यातील मेवापूरसाठी १ अधिग्रहणाची मागणी, तर अहमदपूर तालुक्यील ९ गावे व ५ वाडयासाठी १४ अधिग्रहणाची मागणी पंचायत समितीच्या स्तरावर प्रस्ताव करण्यात आले आहेत. या गावातील नागरीकांना पाणी टंचाईच्या झळा जानवत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या