लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत सोमवार दि. २५ जुलै रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे लातूर जिल्हाध्यक्ष पिराजी साठे यांच्यासह महादू समूखराव, गणेश कांबळे, सोमनाथ चवरे, दयानंद समूखराव, नितीन समूखराव आदी पदाधिका-यांनी असंख्य कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन त्यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अॅड. समद पटेल, माजी महापौर अॅड. दीपक सूळ, माजी नगरसेवक इम्रान सय्यद, कैलास कांबळे, बाबासाहेब गायकवाड आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.