28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरएलआयसी कर्मचा-यांची निदर्शने

एलआयसी कर्मचा-यांची निदर्शने

एकमत ऑनलाईन

लातूर : कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसंदर्भात एलआयसीच्या कर्मचा-यांची दि. १ सप्टेंबर पासून निदर्शने सुरू आहेत.

एलआयएएफआय १९६४ ऑल इंडिया एलआयएएफआय आणि सीएलआयए वेलफेअर असोसिएशन या सारख्या चार वेगवेगळया नोंदणीकृत लाईफ इंश्युरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी एकत्रितपणे संयुक्त कृती समिती म्हणून स्थापन केली आहे. जेएसी-एलआयएएफआय ने पॉलशीधारक तसेच विमा एजंट यांच्याशी संबंधीत मागण्याचे चार्टर व्यवस्थापनाकडे सादर केले आहे.

विनंतीला प्रतिसाद म्हणून व्यवस्थापनाने जेएसी च्या प्रतिनिधींना २९ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीसाठी आमंत्रित केले होते. परंतू आमच्या ख-या मागण्यांना व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नाही. यामुळे संयुक्त कृती समितीने शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले होते.

दरम्यान एजंट समुदाय आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हितासाठी आमच्या ख-या मागण्यांचा विचार करण्यासाठी उच्च व्यवस्थापनाला शिफारीश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या