27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात डेंग्यूचा डंख वाढतोय

लातूर जिल्ह्यात डेंग्यूचा डंख वाढतोय

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात जून महिन्यापासून आजतागायत ३१ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर शेकडो रुग्ण डेंग्यूसदृश्य असून ते उपचार घेऊ न बरे झाले आहेत. काहीजण अद्यापही उपचार घेत आहेत. जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट महिन्यांत चिकुनगुन्याचे रुग्ण आढळल्याची जिल्हा हिवताप विभागाकडे नोंद आहे. रेणापूर, औसा व लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील चिकुनगुन्या आजाराचे १९ नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी १० रुग्ण आढळलेले आहेत. मात्र सप्टेेंबर महिन्यात आतापर्यंत चिकुनगुन्या आजाराचे रुग्ण आढलेले नाहीत.

जून महिन्यात उन्हाळ्याचा शेवट व पावसाळ्याची सुरुवात होण्याच्या हवामान बदलापासून सर्दी, थंडीताप, खोकला या आजारांपासून सुरुवात होते. थंडीताप, अंगदुखी, डोकेदुखी सुरु होते. सर्दी, खोकला अंगावर काढला तर निमोनिया होत आहे आणि थंडीताप अंगावर काढला तर रक्तातील पेशी कमी होऊन डेंग्यू होण्याची शक्यता उद्भवत आहे. जिल्ह्यात जून महिन्यापासून आजतागायत ३१ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक डेंग्यू सदृश्य रुग्ण उपचाराने बरे झाले असून काही रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सध्या ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. शहरासह ग्रामीण भागात असलेली अस्वच्छता, डासांचा उपद्रव, पावसाने मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यातील सरकारी, खाजगी हॉस्पिटलस्मध्ये रुग्णांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, अशा आजाराने त्रस्त आहेत. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून हे आजार वाढल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

प्रत्येक घरात उपरोक्त आजाराचा एकतरी रुग्ण आढळून येत आहे. जिल्ह्यात डेंग्यूचा डंख वाढत चालला आहे. डेंग्यूची साथ असल्याचे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतू, डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने लातूर शहर महानगरपालिकेने शहरात धुर फवारणी सुरु केली आहे. अ‍ॅबेटींगही सुरु आहे. नागरिकांनी घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वच्छ पाण्याचे साठे झाकून ठेवावेत
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसाच्या पाण्याचे डबके जागोजागी साचले आहेत. या डबक्यांतून डासोत्पत्ती होत आहे. तसेच घरात साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात ‘एडिस एजिप्ती’ या डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील स्वच्छ पाण्याचे साठे घट्ट झाकुन ठेवावेत. नारळाच्या वरवंट्या, निकामी टायर्स छतावर ठेऊ नयेत, पाणीसाठेल अशा वस्तू ठेवू नयेत, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या