23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeलातूरजळकोट येथे सहा घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या लारवा

जळकोट येथे सहा घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या लारवा

एकमत ऑनलाईन

जळकोट (ओमकार सोनटक्के ) : जळकोट शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण या सदराखाली एक महीने दि.१४ सप्टेंबरच्या अंकामध्ये वृत्त प्रकाशित केले होते. या बातमीची तात्काळ दखल आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी घेतली असून जळकोट शहरात दि १४ सप्टेंबर रोजी कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले .या एका दिवसात जवळपास ८० घरांमध्ये पाण्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहा घरातील साठवलेल्या पाण्यामध्ये डेंगू रोग ज्या डासापासून होतो त्या डासां च्या अळ्या आढळून आल्या.

जळकोट शहर तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंगूसदस्य आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कमी अधिक प्रमाणात डेंगूचे लक्षण अनेक रुग्णांमध्ये आढळून येत आहेत . जळकोट शहरातील रुग्णालय हाऊसफुल आहेत. रुग्णांना सलाईन चढवून घेण्यासाठी तासनतास वाट पहावी लागत आहे एवढी गंभीर परिस्थिती जळकोट शहरांमध्ये निर्माण झाली आहे तसेच इतर ताप सदृष्य आजाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत .

तालुक्यात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. सध्या जळकोट शहरात रक्त तपासणी मधून डेंग्यूचे रुग्ण ओळखता येऊ लागलेले आहेत. यामुळे तात्काळ जळकोट मध्येच काही प्रमाणात यावर उपचार होत आहेत. अनेक रुग्ण हे पहिल्या टप्प्यातच रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे या आजारावर उपचारही होत आहेत परंतु डेंगू आजार पसरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डास आहेत, जळकोट शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याकारणाने डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच डेंगू सदृष्य आजाराचे प्रमाण देखील वाढले आहे. दैनिक एकमतने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.

त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी तातडीने या वृत्ताची दखल घेऊन जळकोट शहरात किटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यासाठी कीटक समाहारक जिल्हा हिवताप कार्यालय लातूर अजित चव्हाण, हे तातडीने जळकोट शहरात दाखल झाले. त्यांनी आरोग्य सहाय्यक राठोड व श्रीमती काळे, यांच्यासमवेत ८० घरामध्ये कीटक शास्त्रीय सर्वेक्षण केले यामध्ये तब्बल सहा घरांमध्ये डेंगू आजार पसरण्यास कारणीभूत असणा-या डासांची उत्पत्ती करणा-या आळ्या आढळून आल्या तात्काळ या कर्मचा-यांनी या पाण्यामध्ये या आढळून आल्या ते पाणी तात्काळ नष्ट केले. या कारणाने जळकोट शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा डेंग्यूचा डंक महागात पडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या