24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeलातूरकोरोना संकटात डेंगीचा डंख

कोरोना संकटात डेंगीचा डंख

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाचे संकट अजुनही घोंगावत आहे. आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा आणि नागरिक कोरोनाशी लढा देत असताना आता गेल्या आठ दिवसांपासून लातूर शहरात डेंगी सदृश तापीचे रुग्ण वाढत आहेत. दिवसाआठी १०० पैकी २० बालकांना डेंंगी सदृश ताप आढळून येत आहे. अशा रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली असता त्यात प्लेटलेट्स कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ऐन दिवसाळीत नागरिकांसह आरोग्य विभागासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वचजण कोरोना विषाणूच्या संसर्गाची लढा देत आहेत. लॉकडाऊननंतर आता कुठे बाजारपेठांमध्ये रेलचेल दिसून येत आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नातून आजघडीला कोरोनावर काहीं अंशी अंकुश ठेवणयात यश आले आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गाचा वेग मंदावलेला असला तरी कोरोनाचे संकट पुर्णपणाने दुर झालेले नाही. कोरोनाच्या विळख्यातून कशीबशी सुटका होत असल्याची सुखद परिस्थिती निर्माण झालेली असताना आता डेंगीचे नवे संकट समोर उभे राहिले आहे.

संपुर्ण लातूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाबरोबरच परतीचा पाऊसही जोरदार झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाण्याचे डबके जागोजागीही चालले आहेत. लातूर शहरातही अशीच परिस्थिीती आहे. बांधकामांनाही वेग आला आहे. बांधकामांच्या ठिकाणी पााण्याची साठवण केली जाते. नाल्यांतुनही पाणीसाठलेले आहे. घरे, दुकाने, पडीक घरे, खुल्ले प्लॉट, वाहनांचे टायर्स, नारळाच्या करवंट्या, शहाळे, घरातील कुलर, शोभीवंत झाडांच्या कुंड्या आणि घराघरात साठवलेले पाणी त्यात ‘एडिस इजिप्ती’ या डेंगीच्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे.

परिणामी डेंगी सदृश रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य धोक्यात आले असून डेंगीसारख्या आजाराने लहान मुले त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांत लातूर शहरातील विविध बालरुग्णालयांत डेंगीची लागण झालेली मुलं उपचारासाठी येत आहेत.

सर्वच खाजगी बालरुग्णालयांकडून माहिती मागणवली
डेंगी सदृश रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शानास येताच लातूर शहरातील सर्वच खाजगी बालरुग्णालयांना पत्र पाठवून त्यांच्या रुग्णालयांत येणा-या डेंगी सदृश रुग्णाची माहिती मागवली आहे. नागरिकांनी आता कोरोनासोबतच डेंगीचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन लातूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी केले.

कोणत्याही आजाराचा ताप असला तरी डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घ्या
शहरातील डॉ. दत्ता गोजमगुंडे यांच्या गोजमगुंडे बालरुग्णालयात गेल्या आठ दिवसांत १०० पैकी २० बालकांना डेंग सदृश ताप आढळून येत आहे. डॉ. गोजमगुंडे म्हणाले की, तापीचे रुग्ण वाढत आहेत. रक्ताची तपासणी केल्यानंतर प्लेटलेट्स कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कॉम्पलिकेशनस् वाढत आहेत. कोणत्याही आजाराचा ताप असला तरी डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. घर व परिसरातील स्वच्छता, नाल्यांची स्वच्छता, डासांचे निर्मुलन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, पाणी आठ दिवसाला येत असल्यामुळे जास्त दिवस पाणी साठवून न ठेवता एक दिवस पाणीसाठ्याचा कोरडा दिवस पाळावा, मुलांना पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत.

अमेरिकन निकालांचे त्रांगडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या