लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. २२ जुलै रोजी सकाळी लातूर शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री,
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी राजकीय, सामाजिक, विकासात्मक आदी विषयावर चर्चा करून मार्गदर्शन घेतले. याप्रसंगी प्रा बी.व्ही. मोतीपोवळे आदी उपस्थित होते.