21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home लातूर निलंग्यात नगरपालिका कर्मचा-यांची धरणे

निलंग्यात नगरपालिका कर्मचा-यांची धरणे

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा नगर पालिका कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे कायम सेवेत समाविष्ट करून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावे व रोजंदारीवर काम करणा-या सर्व नगरपालिका कर्मचा-यांना सेवेत कायम करावे यासह विविध मागण्यासह नगर पालिका कर्मचा-यांनी काम बंद व एक दिवशीय धरणे आंदोलन केले.

नगर पालिका सफाई कामगाराना मुकादम पदावर पदोन्नती देऊन वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करावी तसेच सफाई कामगाराना मोफत घरे बांधून द्यावी .सफाई कामाची ठेका पध्दत बंद करावी.पूर्वी पासून सफाई कामगार म्हणून नियुक्त झाले आहेत त्याना इतर सफाई कर्मचा-या प्रमाणे वारसा हक्क लागू करावा .५०० लोकसंख्येमागे एक सफाई कामगार पदभरती करावी या जागा निर्माण करण्यासाठी निर्णय घेण्यात यावे.त्याच बरोबर पाणी पुरवठा पदावर असलेल्या कर्मचा-यांना पदोन्नती देऊन लिपिक पदावर कार्यरत करावे.

अनुकंपा धारकांना तात्काळ संधी उपलब्ध करून द्यावी दरवर्षी शासन नियमाप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार अंतीम यादी पदोन्नती प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावे तसेच कोरोना विषाणूचा सामना करताना मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या वारसाला ५० लाख रूपये द्यावे व घरातील एकाला पालिकेत सेवेत कार्यरत करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात कामगार नेते प्रेमनाथ गायकवाड व्ही. पी. बंडे, विक्रम शिंदे , देवक्तते, खरोडे, डी. एल. शिंदे , संदीप निटूरे, दत्ता सुरवसे, कौडगावे अरुणा, महादेव कांबळे, इंद्रजीत जाधव , कृष्णा कांबळे, ढालाईत , लोणारे , सोळुंके, संतोष जाधव उपस्थित होते.

निवृत्ती जाहीर करताना धोनी-रैना होते एकत्र; रैनाने स्वत: दिली माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या