24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरविकासाला राजकीय क्षेत्राची जोड मिळणे गरजेचे

विकासाला राजकीय क्षेत्राची जोड मिळणे गरजेचे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
देशाच्या सर्वांगीन विकासाचा विचार राष्ट्रपुरुषांनी मांडला. संतांचा आणि महापुरुषांचा वारसाच देशाला पुढे घेऊन जावू शकतो. आज देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. गेल्या ७५ वर्षात देशाची झालेली प्रगती अतिशय मोलाची आहे. देशाच्या सामाजिक, सांस्कृतीक विकासाला राजकीय क्षेत्राची जोड मिळाली तर भारत विश्वगुरु होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले.

लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील श्री संत ज्ञानेश्वर घुमट येथे ‘देशाचे सामाजिक, राजकीय आरोग्य’ या विषयावरील आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. हरी नरके बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे होते. यावेळी साहित्यीक प्रा. रतनलाल सोनग्रा, तुळशीराम कराड, काशीराम कराड, डॉ. एन. पी. जमादार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

जिथे स्वातंत्र्य, समता असते तिथेच न्याय असतो. अशा परिस्थितीत देशाचे सामाजिक आणि राजकीय आरोग्य म्हत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती अतिशय मोलाची असून गुणवत्ता, दर्जा वाढला पण यात किती यश मिळाले याचा विचार व्हायला हवा, प्रा. नरके म्हणाले की, एका बाजूला प्रचंड विश्व, प्रगती, झगमगाट आहे तर दुस-या बाजुला कचरा वेचून जगणा-या माणसांची भीषण परिस्थिती आहे. आजही देशात १० लाख भिखारी आहेत, ३० टक्के लोकांना निवारा नाही तर ४० कोटी लोक दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहेत. या परिस्थितीचा विचार करता देशात सामाजिक आणि राजकीय आरोग्याची जोड होणे गरजेचे आहे. सध्या देशात राजकीय वातावरण दूषीत झाले असून शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार अनुकरणात आणल्यास लोकशाही मजबुत होऊन देश विश्वगुरु होण्यास मदत होईल.

यावेळी प्रा. सोनग्रा म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही असल्याने बहुमतांनी निर्णय होतात इतर देशात तसे होत नाही. त्यामुळे त्या देशात आज बह्यावह परिस्थिती आहे. देशाच्या विकासासाठी राजकीय क्षेत्र महत्त्वाचे आहे. देशात वेगवेगळे गट, समुह आहेत. प्रत्येकात असलेल्या गरीबी आणि दारिद्रयाविरुध्द लढण्याची गरज आहे. विकासापासून कोसोदूर असलेला आदिवाशी समाज आज विकासाच्या प्रवाहात येत आहे. आज आदीवाशी महिला देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्चपदी विराजमान झाल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बी. एस. नागोबा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पल्लवी जाधव व डॉ. अमोल डोईफोडे यांनी केले. तर डॉ. एन. पी. जमादार यांनी आभार मानले. यावेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, संचालिका डॉ. सरिता मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. एच. मिश्रा, प्राचार्य सरवनन सेना आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या