29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरलातुरात होणार ३.५ कोटी रुपयांची विकास कामे

लातुरात होणार ३.५ कोटी रुपयांची विकास कामे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा लातूर शहर मतदारसंघाचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील विविध विकास कामांसाठी ३ कोटी ४२ लाख २८ हजार रुपयांचा आमदार निधी दिला आहे. या निधीतून शहराच्या विविध भागात विकासकामे केली जाणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
शहरातील विविध भागात ही विकास कामे केली जाणार आहेत. त्यात प्रभाग क्रमांक १ मधील माळीगल्ली व यहीय्या कॉलनीमध्ये सिमेंट रस्ता होणार असून त्यासाठी ९ लाख ८० हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रभाग २ मधील भारत सोसायटीत सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी ९ लाख ७४ हजार १०० रुपये, प्रभाग २ मधील ज्ञानेश्वर चौक ते अराफत चौक सिमेंट काँक्रीट नालीसाठी ४ लाख ९४ हजार ५०० रुपये, याच प्रभागातील सूर्यवंशीनगर येथे बनसोडे निवास ते कांबळे निवास या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी ४ लाख ९५ हजार ४०० रुपये, साईबाबानगर व बरकतनगरमधील रस्ता व सिमेंट काँक्रीट नालीसाठी ९ लाख ८५ हजार ८०० रुपये, हरिभाऊनगर येथे सार्वजनिक जागेत सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी ९ लाख ७४ हजार १०० रुपये, प्रभाग क्रमांक ३ मधील शाळा क्रमांक ५ येथे अभ्यासिका बांधण्यासाठी ९ लाख ७४ हजार १०० रुपये, याच प्रभागात खेताभाई पटेल ते खांडेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नालीसाठी ९ लाख ५५ हजार ६०० रुपये, याच अंतरात सिमेंट रस्त्यासाठी ९ लाख ६३ हजार १०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत काझी मोहल्ला येथील सुफिया मस्जिदच्या मागील गल्ली क्रमांक १ व २ मध्ये सिमेंट काँक्रीट नालीसाठी ९ लाख ७० हजार रुपये, बादाडेनगरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर सांस्कृतिक सभागृहासाठी ९ लाख ७४ हजार १०० रुपये, बापू सोमवंशी यांचे घर ते काझी कबरस्तानपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी १४ लाख ७७ हजार २०० रुपये, सूर्यमुखी हनुमान मंदिर ते रिंगरोडपर्यंत सिमेंट रस्त्यासाठी ९ लाख ८४ हजार ८०० रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रभाग ५ मधील गौसपुरा गल्ली क्रमांक ५ व ६ मधील नाली सिमेंट काँक्रीट करण्यासाठी ९ लाख ६७ हजार २०० रुपये,मंठाळे नगर येथे अंतर्गत रस्त्यासाठी ९ लाख ८४ हजार ८०० रुपये, श्रीकृष्णनगरमधील सिमेंट काँक्रीट नालीसाठी ९ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा निधी दिला जाणार आहे. प्रभाग ७ अंतर्गत वैदू वस्तीमध्ये सभागृह व तालीम बांधण्यासाठी ९ लाख ७४ हजार १०० रुपये, ताजोद्दिन बाबानगर येथे सिमेंट रस्त्यासाठी ९ लाख ८६ हजार ६०० रुपये, अन्सार कॉलनीमध्ये अयाज शेख ते चौधरी यांच्या दुकानापर्यंत सिमेंट काँक्रीट नालीसाठी ९ लाख ७७ हजार ५०० रुपये, मैसूर कॉलनीत शेख बबलू ते शेख सुलेमान यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली साठी ९ लाख ८३ हजार ७०० रुपये, प्रभाग ९ अंतर्गत मदने नगर येथे सूर्यवंशी यांचे घर ते बालाजी कागदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी ९ लाख ६७ हजार ४०० रुपये, ज्ञानेश्वर नगर येथील रुमणे यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता व नालीसाठी ९ लाख ७२ हजार ३०० रुपये, हमाल गल्ली येथील अमजद खान यांचे घर ते खानापुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी ९ लाख ८८ हजार ३०० रुपये.

प्रभाग १० अंतर्गत विशालनगर येथे काशी विश्वेश्वर मंदिर परिसरातील सिमेंट रस्त्यासाठी ९ लाख ८८ हजार ३०० रुपये, सुळ गल्­ली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी ९ लाख ७४ हजार १०० रुपये, स्वामी समर्थनगर येथील खूमसे यांच्या घरापासून अ‍ॅड. विहिरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी ९ लाख ८८ हजार ३०० रुपये, नृसिंहनगर येथे सिमेंट काँक्रीट नालीसाठी ९ लाख ८५ हजार १०० रुपये, प्रभाग ११ अंतर्गत विक्रम नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी ९ लाख ८८ हजार ३०० रुपये, अग्रोयानगर व श्रीनगर येथे रस्ता व नाली साठी ९ लाख ७९ हजार २०० रुपये, प्रभाग १३ मध्ये प्रकाशनगरमधील सावंत किराणा पासून चलमले यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रीट नालीसाठी ९ लाख ६१ हजार २०० रुपये, सावंत किराणा ते चलमले यांच्या घरापर्यंत डांबरी रस्त्यासाठी ९ लाख ६४ हजार ८०० रुपये, प्रकाश नगर येथे रस्ते व नालीसाठी ४ लाख ९४ हजार ५०० रुपये, प्रकाश नगर मधील गडकर किराणा दुकान ते चेतन मिरकले यांच्या घरापर्यंत डांबरी रस्त्यासाठी ९ लाख ९५ हजार ८०० रुपये.

प्रभाग १४ मध्ये लक्ष्मी कॉलनी मधील सिमेंट रस्त्यासाठी ९ लाख ८८ हजार ३०० रुपये, प्रभाग क्रमांक १२ मध्ये अभिमन्यू अंबर यांच्या घरापासून सूर्यकांत थोरात यांच्या घरापर्यंत सोनानगर येथे रस्ता व नालीसाठी ४ लाख ८७ हजार ३००रुपये आणि प्रभाग क्रमांक ५ मधील कोल्हे नगरात विठ्ठल नांदे यांच्या घरापासून मुजुमदार यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूस नाली व सिमेंट रस्त्यासाठी १४ लाख ७२ हजार १०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी शहरातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आभार मानले आहेत. या निधीच्या माध्यमातून विकासकामे लवकरात लवकर सुरु केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या